Redmi Best Selling Smartphones: अॅमेझॉनवर वर्षातील सर्वात मोठा सेल सुरू आहे. या सेलमध्ये अनेक स्मार्टफोन्सवर मोठी सवलत मिळत आहेत. या सेलमध्ये रेडमीचे सर्वाधिक विकले जाणारे स्मार्टफोन अवघ्या १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध झाले आहेत. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये हे फोन जोरदार डिस्काउंटसह विकले जात आहेत. या शानदार रेडमी फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १०८ एमपीपर्यंत कॅमेरा आहे. त्यामुळे नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे.
रेडमी नोट १३ 5G च्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट अॅमेझॉनवरून १४ हजार १०२ रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो. या फोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. रेडमी नोट १३ 5G मध्ये ६ एनएम मीडियाटेक डायमेंसिटी ६०८० चिप आहे. फोनचा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. रेडमी नोट १३ 5G जी च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर यात १०८ एमपी प्रायमरी कॅमेरा आणि २ एमपी डेप्थ कॅमेरा मिळत आहे. तर, फोनच्या फ्रंटमध्ये १६ एमपी सेल्फी कॅमेरा आहे. यात ५ हजार एमएएचची बॅटरी मिळेल, जी ३३ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
रेडमीचा ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट अॅमेझॉनवरून १३ हजार १३५ रुपयांना खरेदी करता येईल. रेडमी १३ 5G फोनमध्ये हायपरओएस आहे. या मोबाइलमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन २ ऑक्टाकोर प्रोसेसर असेल. फोटोग्राफीसाठी रेडमी १३ 5G ड्युअल रिअर कॅमेरा सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनेलमध्ये एलईडी फ्लॅशसह सुसज्ज १०८ एमपी सुपर क्लिअर मेन कॅमेरा असेल. यात २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्सही मिळू शकतो. तर, रेडमी १३ 5G १३ एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी रेडमी १३ 5G मध्ये ५०३० एमएएच क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे.
रेडमी नोट १२ चा ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरियंट अॅमेझॉनच्या फेस्टिव्हल सेलमधून १२ हजार ९७० रुपयांमध्ये खरेदी करता येईल. स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६८५ प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १३ वर आधारित एमआययूआय १४ वर चालतो. यात ५० मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा सेकंड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. तर, फ्रंटमध्ये १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. रेडमी नोट १२ 4G मध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली, जी ३३ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फ्रीडम फेस्टिव्हल सेलमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंट १० हजार ९९९ रुपयांना विकला जात आहे. रेडमी १३ सी मध्ये ६.७४ इंचाचा ड्यूड्रॉप एलसीडी डिस्प्ले आहे, त्याचे रिझोल्यूशन १६०० बाय ७२० पिक्सल आहे. डिस्प्लेमध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ६०० निट्सची पीक ब्राइटनेस आहे. रेडमी १३ सी 5G मध्ये मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ५० एमपी सेन्सर आणि सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी ५ मेगापिक्सल एमपी फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
अॅमेझॉनवर रेडमी १२ डिव्हाइसची किंमत ९ हजार ९९९ रुपये आहे. रेडमी १२ मध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७९ इंचाचा एलसीडी डिस्प्ले आहे. यात मीडियाटेक हेलियो जी८८ प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ५० एमपी प्रायमरी सेन्सर, ८ एमपी अल्ट्रावाइड सेन्सर आणि २ एमपी मॅक्रो सेन्सर आहे. तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटमध्ये ८ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. रेडमी १२ मध्ये ५००० एमएएचची मोठी बॅटरी आणि १८ वॉट फास्ट वायर्ड चार्जिंग आहे.