Redmi Upcoming Smartphones: रेडमी कंपनीचा नवा स्मार्टफोन येत्या १४ फेब्रुवारीला जागतिक बाजारात लॉन्च होणार आहे. मात्र, यापूर्वीच हा फोन विक्रीसाठी फ्लिपकार्टवर उपलब्ध झाला आहे. फ्लिपकार्टने रेडमी ए ३ चे काही खास फीचर्स त्यांच्या साईटवर टीझ केले आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.
फ्लिपकार्ट आणि एमआय इंडिया या दोघांनी त्यांच्या वेबसाइट्सवर या फोनच्या आगमनाची घोषणा करण्यासाठी मायक्रोसाइट्स तयार केली आहे. फोनमध्ये मोठ्या वर्तुळाकार मागील कॅमेरा मॉड्यूलसह सर्व-नवीन 'हॅलो-डिझाइन' आहे. हा फोन हिरव्या रंगात लिस्ट करण्यात आला आहे. या फोनमध्ये ग्राहकांना दमदार बॅटरीसह ६ जीबी रॅम मिळणार आहे आणि ६ जीबी रॅम व्हर्च्युअल रॅम मिळत आहे. रेडमी ए ३ भारतात १४ फेब्रुवारीला लॉन्च होईल. या फोनची किंमत ७ हजार- ९ हजार रुपयांच्या दरम्यान असेल, अशी माहिती मिळत आहे.
रेडमी ए ३ मध्ये १२० Hz टच सॅम्पलिंग रेटसह ६.७१ इंच फुल एचडी प्लस १६००० x७२० पिक्सेल एलसीडी डिस्प्ले मिळण्याची अपेक्षा आहे. हे MediaTek Helio G36 प्रोसेसरने सुसज्ज असू शकते. यात १३ मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सल कॅमेरा मिळू शकतो.
रेडमी ए ३ मागील वर्षीच्या रेडमी ए २ चा उत्तराधिकारी म्हणून लॉन्च केला जाईल. रेडमी ए २ स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची (२ जीबी रॅम आणि ३२ जीबी) किंमत ५ हजार ९९९ रुपये होती. तर, २ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत ६ हजार ४९९ रुपये आणि ४ जीबी रॅम/६४ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे.