Redmi 14C: धमाकेदार फीचर्ससह रेडमीचा नवा फोन लॉन्च; किंमत पाहून म्हणाल, लॉटरीच लागली!-redmi 14c with 6 88 inch lcd screen mediatek helio g81 chipset launched price specifications ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Redmi 14C: धमाकेदार फीचर्ससह रेडमीचा नवा फोन लॉन्च; किंमत पाहून म्हणाल, लॉटरीच लागली!

Redmi 14C: धमाकेदार फीचर्ससह रेडमीचा नवा फोन लॉन्च; किंमत पाहून म्हणाल, लॉटरीच लागली!

Aug 31, 2024 03:14 PM IST

Redmi 14C Launched: नुकताच रेडमी कंपनीचा बजेट स्मार्टफोन रेडमी १४ सी बाजारात दाखल झाला असून ग्राहकांना कमी किंमतीत अनेक दमदार फीचर्स मिळत आहेत.

रेडमी १४ सी बाजारात दाखल
रेडमी १४ सी बाजारात दाखल

Redmi 14C Price and Features: रेडमीने आपल्या स्मार्टफोनची रेंज वाढवत नवीन स्मार्टफोन रेडमी १४ सी बाजारात लॉन्च केला आहे. हा फोन बजेट सेगमेंटमध्ये येतो. कंपनीने यावर्षी मार्चमध्ये व्हिएतनाममध्ये पहिल्यांदा हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. मात्र, आता हा फोन जागतिक बाजारपेठेत दाखल झाला आहे. हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजसह येतो. अगदी परवडणाऱ्या किंमतीत या फोनमध्ये दमदार बॅटरी, मोठा डिस्प्ले आणि ५० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे.

रेडमी १४ सी: डिस्प्ले

रेडमीच्या या स्मार्टफोनमध्ये ६.८८ इंचाचा डॉट ड्रॉप डिस्प्ले देत आहे. रेडमीच्या नंबर सीरिजच्या फोनमध्ये देण्यात येणारा हा सर्वात मोठा डिस्प्ले आहे. फोनमध्ये देण्यात येणाऱ्या या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्झ आहे. हा डिस्प्ले ६०० निट्सच्या पीक ब्राइटनेस लेव्हलला सपोर्ट करेल.

रेडमी १४ सी: कॅमेरा

फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह दोन कॅमेरे देत आहे. यामध्ये ५० मेगापिक्सेलचा मेन लेन्स असलेला आणखी एक कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटमध्ये १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळत आहे. उत्तम इमेज क्वालिटी सुधारण्यासाठी फोनमध्ये एचडीआर सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

रेडमी १४ सी: स्टोरेज

कंपनीने हा फोन ८ जीबी पर्यंत एलपीडीडीआर ४ एक्स रॅम आणि २५६ जीबी ईएमएमसी ५.१ स्टोरेजसह लॉन्च केला आहे. मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने फोनची मेमरी देखील वाढवू शकता.

रेडमी १४ सी: बॅटरी

फोनमध्ये देण्यात आलेली बॅटरी ५ हजार १६० एमएएचची आहे. ही बॅटरी १८ वॅट चार्जिंगला सपोर्ट करेल, पण कंपनी या फोनसोबत चार्जर देत नाही. ओएसबद्दल बोलायचे झाले तर रेडमीचा हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित हायपरओएसवर काम करतो. 

रेडमी १४ सी: कनेक्टिव्हिटी

बायोमेट्रिक सुरक्षेसाठी कंपनी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देत आहे. तर, कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये तुम्हाला ड्युअल सिम सपोर्ट, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि एनएफसी सारखे पर्याय मिळतील. रेडमी १४ सी मिडनाइट ब्लॅक, ड्रीमी पर्पल, सेज ग्रीन आणि स्टारी ब्लू या ४ रंगांमध्ये उपलब्ध आहे. याची सुरुवातीची किंमत ११९ डॉलर (जवळपास ९,९८२ रुपये) आहे.

विभाग