मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Redmi 13: रेडमी १३ भारतात लॉन्च! परवडणाऱ्या किंमतीत १०८ मेगापिक्सल कॅमेरा आणि ५,०३० एमएएच बॅटरी

Redmi 13: रेडमी १३ भारतात लॉन्च! परवडणाऱ्या किंमतीत १०८ मेगापिक्सल कॅमेरा आणि ५,०३० एमएएच बॅटरी

Jul 09, 2024 08:39 PM IST

Redmi 13 5G launched: चीनी कंपनी शाओमीचा नवा फोन रेडमी १३ 5G भारतात लॉन्च झाला आहे. या फोनमध्ये ग्राहकांना उत्कृष्ट अशी फिचर्स मिळणार आहेत.

शाओमीचा नवा फोन रेडमी १३ 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
शाओमीचा नवा फोन रेडमी १३ 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स (Aishwarya Panda)

Redmi 13 5G Launched in India: शाओमीने आपल्या लोकप्रिय रेडमी लाइनअपमध्ये नवीनतम भर घालण्यासह अनेक नवीन उत्पादने लॉन्च करून आपला १० वा वर्धापनदिन साजरा केला. नव्याने अनावरण करण्यात आलेल्या रेडमी १३ 5G मध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि टिकाऊ कॉर्निंग गोरिल्ला ग्लास रियर पॅनेलसह सुसज्ज ६.७९ इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन २ प्रोसेसरसह संचालित रेडमी १३ 5G शाओमीच्या नवीनतम हायपरओएसवर कार्य करते. हे मॉडेल ऑगस्ट २०२३ मध्ये लॉन्च झालेल्या रेडमी 12 5G ची जागा घेईल.

किंमत आणि उपलब्धता

रेडमी १३ 5G बेस मॉडेलची किंमत १३ हजार ९९९ रुपये आहे आणि १२ जुलैपासून अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध आहे. या लाँचिंगमध्ये कार्ड डिस्काउंटच्या माध्यमातून १,००० रुपयांची सूटसह विविध डिस्काउंट ऑफर्स देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे ग्राहकांना हा फोन अगदी स्वस्तात खरेदी करता येणार आहे. हा फोन ओशन ब्लू, पर्ल पिंक आणि मिडनाइट ब्लॅक या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन ६ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम/१२८ स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटसह बाजारात लॉन्च झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

रेडमी १३ 5G मध्ये ग्लास बॅक आहे. यात रियर पॅनेलच्या वरच्या डाव्या बाजूला रिंग लाइटसह ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामुळे त्याच्या डिझाइनमध्ये भर पडली आहे. डिव्हाइसमध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, पंच-होल नॉच आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शनसह ६.७९ इंचाचा डिस्प्ले आहे. हा स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन २ प्रोसेसरवर चालतो, जो रेडमी १२ 5G सारखाच आहे. मागील मॉडेलमध्ये एमआययूआय १४ चा वापर करण्यात आला होता. तर, रेडमी १३ 5G शाओमीच्या हायपरओएससह पदार्पण करते, ज्याचा उद्देश वापरकर्त्यांना अधिक चांगला अनुभव देणे आहे.

या स्मार्टफोनमध्ये जलद रिचार्ज आणि दीर्घ वापरासाठी ३३ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी ५,०३० एमएएच बॅटरी देण्यात आली. यात १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेन्सर आणि सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

WhatsApp channel