Redmi 12 5G launch soon : शाओमी कंपनी येत्या १ आॅगस्टला भारतात अनेक नवीन उत्पादने लाँन्च करत आहेत. त्यात रेडमी १२ ५ जीबी वाॅच ३ अॅक्टिव्ह आणि शाओमी स्मार्ट टीव्ही एक्स सिरिजचा समावेश आहे.कंपनीने आत्तापासून अॅमेझाॅन ई काॅमर्स वेबसाईटवर रेडमी १२ ५ जी स्मार्टफोन टीज कऱण्यास सुरूवात केली आहे. यामुळे स्पेसिफिकेशन आधीच लिक झाले आहे.
अॅमेझाॅन इंडियाने अपकमिंग रेडमी १२ ५ जी स्मार्टफोनसाठी लँडिंग पेज बनवले आहे. कॅमेऱ्यामध्ये स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकतो. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, एक कॅमेरामध्ये फिम फिल्टरसह ५० एमपी सेंसर असेल. स्मार्टफोनमद्ये १२ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज सुविधा आहे.
शाओमीने स्मार्ट टीव्ही एक्स सिरीज टीव्ही १ आँगस्टला लाँन्च करण्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी दाखल झालेल्या ४ के स्मार्ट टीव्हीची जागा हा नवा टीव्ही घेईल.