Red Magic Gaming Smartphones: गेमिंग स्मार्टफोन निर्माता रेड मॅजिक आपला जबरदस्त स्मार्टफोन रेड मॅजिक १० प्रो प्लस लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा फोन हेवी स्पेसिफिकेशन्ससह येणार आहे. एका रिपोर्टनुसार, नुबियाची रेड मॅजिक १० प्रो सीरिज मोबाईल गेमिंग परफॉर्मन्समध्ये नव्या गोष्टी घेऊन येणार आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, रेड मॅजिक १० प्रो प्लस मध्ये अनेक आकर्षित आणि दमदार फीचर्स मिळत आहेत.
एनएक्स ७८९ जे कोडनेम असलेल्या या फोनने ३१,१६,१२६ गुणांसह मागील विक्रम मोडले आहेत, अशी माहिती गिझमोचायनाने आपल्या अहवालात दिली आहे. या अपवादात्मक कामगिरीचे श्रेय त्याच्या शक्तिशाली हार्डवेअरला दिले जाते. फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसर, २४ जीबी LPDDR5X रॅम आणि १ टीबी यूएफएस ४.० स्टोरेज आहे. फोनमध्ये १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट डिस्प्ले असेल आणि हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड १५ ऑपरेटिंग सिस्टिमवर चालेल.
रेड मॅजिक १० प्रो सीरिजमध्ये खास करून गेमर्ससाठी खास फीचर्स देण्यात आले आहेत, असेही म्हटले जात आहे. या फोनमध्ये आयसीई एक्स मॅजिक कूलिंग सिस्टमचा समावेश आहे. परफॉर्मन्स सुधारण्यासाठी स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसररेड मॅजिकच्या आर 3 गेमिंग चिपसोबत जोडला गेला आहे.
फोनमध्ये ७०५० एमएएच बॅटरी, १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेट, २००० निट्स पीक ब्राइटनेस, अंडर डिस्प्ले सेल्फी कॅमेरा आणि फिंगरप्रिंट सेन्सरसह हाय रिझोल्यूशन २६८८ बाय १२१६ पिक्सल डिस्प्ले मिळत आहे. बॅटरीची क्षमताही वाढवण्यात आली आहे, जी आता गेमिंग सेशनसाठी ७०५० एमएएच ऑफर करते.
ब्रँडचा गेमप्ले डेटा दर्शवितो की, होनकाई इम्पॅक्ट ३ फोनवर ६० मिनिटांपर्यंत टिकू शकतो, कमीत कमी ६०.१ एफपीएसच्या फरकासह ०.२ एफपीएसचा सरासरी फ्रेम रेट राखतो. हा फोन 2K वर १२० एफपीएसपर्यंतच्या गेमिंग रिझोल्यूशनला सपोर्ट करतो. रेड मॅजिक १० प्रो सीरिज १३ नोव्हेंबर २०२४ रोजी चीनमध्ये लॉन्च होणार आहे.