TCS Recruitment : जगभरातील कंपन्यानी नोकर कपातीचे धोरण अवलंबले आहे. या कंपन्या कर्मचाऱ्यांना कमी करत आहेत. असे असतांना भारतातील आघाडीची आयटी कंपनी असलेली टाटा कंन्सल्टेंसी सर्व्हिसेज (TCS) मात्र वेगळे धोरण अवलंबले आहे. टीसीएस कंपनी २०२४ मध्ये तब्बल तब्बल ४० हजार कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. या कंपनीत फ्रेशर्सना प्राधान्याने संधी दिली जाणार आहे. विशेष करून बीटेक, बीई, एमसीए, एमएससी आणि एमएस झालेल्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळणार आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस ही देशातील मोठी आयटी कंपनी आहे. या वर्षी ही कंपनी ४० हजार फ्रेशरना संधी देणार आहे. कंपनीचे मुख्य ऑपरेटिंग ऑफिसर एन. गणपथी सुब्रमण्यम यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या आर्थिक वर्षात कंपनी कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवणार आहे. टीसीएस कंपनीमध्ये नोकर कपातीची कोणतीही योजना नाही, अशी माहिती सुब्रमण्यम यांनी दिली आहे.
टीसीएसने भरतीसाठी तीन गट तयार केले आहे. यात नींजा, डिजिटल व प्राइम आहे. निंजा प्रकारात ३.३६ लाख तर डिजिटल प्रकारात ७ लाख व प्राइम गटात ९ ते ११ लाखांचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे. या साठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. बिझनेस प्रोसेसिंग स्पेशालिस्टसाठी असणाऱ्या रिक्त जागावर देखील भरती केलीजाणार आहे. कंपनी कला, वाणिज्य व विज्ञान पदवीधरांना या साठी संधी देणार आहे. या पदवीधरांना बिझनेस प्रोसेसिंग स्पेशालिस्ट म्हणून नियुक्त केली जाईल.
गेल्या १२ ते १४ महिन्यांत मागणीत मोठी घसरण झाली. तरीही देखील आम्ही गरजेपेक्षा अधिक कर्मचारी घेत आहोत. तब्बल ३५ ते ४० हजार नवे कर्मचारी दरवर्षी नियुक्त केले जातात. कंपनीचा वापर दर सध्या सुमारे ८५ टक्के आहे, पूर्वीच्या ८७ ते ९० टक्क्यांपेक्षा त्यात किरकोळ घट झाली आहे. कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात टाळेबंदीची कोणतीही योजना नाही, असे सुब्रमण्यम म्हणाले.
सध्या कंपनीच्या सहा लाख कर्मचाऱ्यांपैकी दहा टक्के म्हणजेच ६० हजार कर्मचाऱ्यांनी गेल्या वर्षभरात आवश्यक प्रशिक्षण आणि कौशल्ये आत्मसात केली आहेत. त्यामुळे हे कर्मचारी कामासाठी सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे कंपनीकडे कामांची मागणी वाढली. तर ती पूर्ण करण्यास कंपनी सज्ज आहे, असे स्वामी म्हणाले.