Realme V60 Pro: पाण्यात पडला तरी काही होणार नाही, रियलमीनं लॉन्च केला वॉटरप्रूफ फोन!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Realme V60 Pro: पाण्यात पडला तरी काही होणार नाही, रियलमीनं लॉन्च केला वॉटरप्रूफ फोन!

Realme V60 Pro: पाण्यात पडला तरी काही होणार नाही, रियलमीनं लॉन्च केला वॉटरप्रूफ फोन!

Nov 29, 2024 03:18 PM IST

Realme V60 Series: रिअलमी कंपनीचा बजेट स्मार्टफोन रियलमी व्ही ६० प्रो स्मार्टफोन बाजारात दाखल झाला आहे. या फोनमध्ये ग्राहकांना कमी किंमतीत दमदार फीचर्स मिळत आहेत.

Realme लाया वाटरप्रूफ फोन
Realme लाया वाटरप्रूफ फोन

Realme V60 Pro Launched: रिअलमीने व्ही सीरिजमध्ये कंपनीचा नवा बजेट 5G स्मार्टफोन रियलमी व्ही ६० प्रो लॉन्च केला आहे. फोनमध्ये ५६०० एमएएचची बॅटरी, एकूण २४ जीबी रॅम देण्यात आली आहे. यात १२ जीबी रॅम हार्डवेअर + १२ जीबी व्हर्च्युअल रॅम आहे. या फोनसोबत ग्राहकांना एक वर्षाची वॉटरप्रूफ वॉरंटी+ दोन वर्षांची वॉरंटी मिळते. हा फोन चीनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. रिअलमी व्ही ६० प्रोमध्ये मिळणारे फीचर्सबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रियलमी व्ही ६० प्रो: किंमत

किंमत रियलमी व्ही ६० प्रो ऑब्सिडियन गोल्ड, रॉक ब्लॅक आणि लकी रेड रंगात येतो. फोनच्या १२ जीबी + २५६ जीबी व्हर्जनची किंमत १५९९ युआन (अंदाजे १८,६७५ रुपये) आणि टॉप व्हेरियंटची किंमत १२ जीबी रॅम+ ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत १७९९ युआन (अंदाजे २१ हजार १५ रुपये) आहे. हा फोन चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

रियलमी व्ही ६० प्रो: डिस्प्ले

या रियलमी फोनमध्ये ६.६७ इंचाची एचडी + १२० हर्ट्झ एलसीडी स्क्रीन आहे. 

रियलमी व्ही ६० प्रो: कॅमेरा

रियलमी व्ही ६० प्रो मध्ये ५० एमपी रिअर कॅमेरा, एलईडी फ्लॅश आणि ८ एमपी फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर. फोनमध्ये अल्ट्रा लिनियर स्पीकर देण्यात आला आहे.

रियलमी व्ही ६० प्रो: स्टोरेज

फोनमध्ये नवीन मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० एसओसी प्रोसेसर आणि १२ जीबी रॅम + १२ जीबी डायनॅमिक रॅम देण्यात आली आहे. रियलमी व्ही सीरिजमध्ये पहिल्यांदाच धूळ आणि पाण्यापासून बचाव करण्यासाठी फोनला आयपी ६८+ आयपी ६९ रेटिंग मिळाले आहे. 

रियलमी व्ही ६० प्रो: बॅटरी

फोनमध्ये मिलिटरी ग्रेड ड्रॉप रेझिस्टन्स आहे. रियलमी व्ही ६० प्रो मध्ये ५६०० एमएएच बॅटरी आहे, जी ४५ वॅट सुपरव्हीओसी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

रियलमी व्ही ६० प्रो: कनेक्टिव्हिटी

फोनचे डिझाइन व्हिएतनाममध्ये नुकतेच सादर करण्यात आलेल्या रियलमी सी ७५ सारखेच दिसते. हा फोन अँड्रॉइड १४ वर चालतो आणि रियलमी यूआय ५.० वर आहे. अधिक माहितीसाठी ग्राहकांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी. 

 

 

Whats_app_banner