Realme Smartphones Under 8000: रिअलमीच्या अधिकृत वेबसाईटवर रिअलमी डेज सेल सुरू आहे. या सेल अंतर्गत ग्राहकांना रिअलमी कंपनीचा जबरदस्त स्मार्टफोन ८ हजारांहून कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली. रिअलमी कंपनीचा सी ५१ स्मार्टफोन (४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज) अवघ्या ७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येणार आहे. रिअलमी सेल अंतर्गत हा फोन १ हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.
हा फोन खरेदी करण्यासाठी मोबीक्विकचा वापर करण्याऱ्या ग्राहकांना ५०० रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा आणि ३३ वॅट फास्ट चार्जिंगसह अनेक खास फीचर्स मिळत आहेत. रिलमी सी ५१ स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सबाबत जाणून घेऊयात.
रिअलमी सी ५१ स्मार्टफोनमध्ये ६.७४ इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. हा डिस्प्ले ९०Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. त्याचा टच सॅम्पलिंग रेट १८०Hz आहे. हा डिस्प्ले ५६० nits च्या पीक ब्राइटनेस लेव्हलला सपोर्ट करतो. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये Mali G57 GPU सह शक्तिशाली ऑक्टा-कोर चिपसेट आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलइडी फ्लॅशसह ५० मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तर, सेल्फीसाठी ग्राहकांना फोनमध्ये ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळत आहे. फोनमध्ये दिलेली बॅटरी ५ हजार एमएएच आहे. ही बॅटरी ३३ वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 13 वर आधारित Realme UI T Edition वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Wi-Fi, Bluetooth 5.0, GPS, USB Type-C आणि 35mm हेडफोन जॅक सारखे पर्याय देण्यात आले आहेत. हा फोन मिंट ग्रीन आणि कार्बन ब्लॅक या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.