Realme P2 Pro 5G launched in India: या वर्षाच्या सुरुवातीला रियलमीने मिड-रेंज सेगमेंटमधील भारतीय तरुणांसाठी नवीन पी-सीरिज स्मार्टफोनची घोषणा केली होती. आता अवघ्या काही महिन्यांत कंपनी रियलमी पी2 प्रो 5जी या दुसऱ्या जनरेशनच्या स्मार्टफोनसह परत आली आहे. हा स्मार्टफोन नवीन डिझाइनसह येतो, जो विशेषत: युवा वापरकर्त्यांच्या आवडीसाठी तयार करण्यात आला आहे.
रियलमी पी २ प्रो 5G जी मध्ये ६.७ इंचाचा सॅमसंग कर्व्ड एमोलेड डिस्प्ले आहे, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २००० निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ७ एस जेन २ 5G चिपसेटसह १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज आहे.
रियलमी पी 2 प्रो 5 जी मध्ये सोनी एलवायटी -600 सेन्सर सह 50 एमपी मुख्य कॅमेरा आणि 8 एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरासह ओआयएस सपोर्ट सह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. फ्रंटमध्ये ३२ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात एआय अल्ट्रा क्लॅरिटी, एआय स्मार्ट रिमूव्हल, एआय ग्रुप फोटो एन्हान्समेंट आणि एआय ऑडिओ झूमसह अनेक कॅमेरा एआय फीचर्स सपोर्ट केले आहे.
स्मार्टफोनमध्ये ५२०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे जी ८० वॅट सुपरवूक फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. रियलमी पी २ प्रो रियलमी यूआय ५.० वर चालतो, जो अँड्रॉइड १४ वर आधारित आहे.
रियलमी पी २ प्रो 5G दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे; हा स्मार्टफोन हिरवा आणि ईगल ग्रे अशा दोन रंगात उपलब्ध आहे. ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची सुरुवातीची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. कंपनी २००० रुपयांचे कूपन देखील देत आहे, ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत कमी होईल. रियलमी पी २ प्रो 5G अर्ली बर्ड सेल १७ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत सुरू होईल आणि खरेदीदार फ्लिपकार्ट किंवा रियलमी इंडिया ऑनलाइन स्टोअरवरून मिळवू शकतात.