Realme P1 5G Feather Blue Edition Launched in India: रियलमीने आपल्या लेटेस्ट फोनचे नवे कलर व्हेरियंट भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. वास्तविक, ब्रँडने रियलमी पी 1 5G चे नवीन फेदर ब्लू कलर व्हेरिएंट लॉन्च केले आहे. हा फोन सर्वप्रथम फिनिक्स रेड आणि पीकॉक ग्रीन कलर व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला होता. नवीन रंग आल्यानंतर ग्राहकांना आता तीन रंगांमधून आपला आवडता व्हेरियंट निवडता येणार आहे. रियलमी ६ जीबी रॅम मॉडेलवर १००० रुपयांची सूट देत आहे, त्यानंतर ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज १३ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.
रियलमी पी१ 5G आता तीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. रॅम आणि स्टोरेजनुसार हा फोन तीन व्हेरियंटमध्ये येतो. 6 जीबी रॅम+ १२८ जीबी स्टोरेजची किंमत १४ हजार ९९९ रुपये, ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत १६ हजार ४९९ रुपये आहे आणि १२ जीबी + २५६ जीबी मॉडेलची किंमत १८ हजार ९९९ रुपये आहे.
हा स्मार्टफोन आजपासून फ्लिपकार्ट आणि रियलमी इंडिया ई-स्टोअरवर उपलब्ध आहे. रियलमीने १२८ जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम व्हेरियंटच्या किंमतीत अनुक्रमे १ हजार आणि १,५०० रुपयांची कपात केली आहे. फ्लिपकार्टवर एचडीएफसी कार्डचा वापर करून ग्राहकांना अतिरिक्त १,००० रुपयांचा बँक डिस्काउंट देखील मिळू शकतो. ऑफरनंतर ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज असलेला मॉडेल १३ हजार ९९९ रुपयांमध्ये तर, ८ जीबी + १२८ जीबी मॉडेल १४ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
स्मार्टफोनच्या नवीन फेदर ब्लू शेडमध्ये टेक्सचर्ड पॅटर्नसह मागील बाजूस फिनिक्स डिझाइन सारखेच आहे. रियलमी पी १ 5G मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह फ्लॅट एमोलेड डिस्प्ले आहे. डिस्प्ले २४० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि २००० निट्स पीक ब्राइटनेससह येतो. हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी ७०५० चिपसेटसह सुसज्ज आहे, जो LPDDR4X रॅम आणि यूएफएस २.२ इंटरनल स्टोरेजसह जोडला गेला आहे. हा फोन अँड्रॉइड १४ वर आधारित रियलमी यूआय ५.० वर काम करतो. फोनमध्ये दोन अँड्रॉइड अपडेट दिले जातील, असे कंपनीचे म्हणणे आहे.
फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप असून ४५ मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा लेन्स देण्यात आला आहे. फोनमध्ये ४५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी हा फोन आयपी ५४ रेटिंगसह येतो.