Realme Note 60x: १२ जीबी रॅम आणि रेनवॉटर टचसोबत रियलमीचा नवा फोन लॉन्च, जाणून घ्या किंमत!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Realme Note 60x: १२ जीबी रॅम आणि रेनवॉटर टचसोबत रियलमीचा नवा फोन लॉन्च, जाणून घ्या किंमत!

Realme Note 60x: १२ जीबी रॅम आणि रेनवॉटर टचसोबत रियलमीचा नवा फोन लॉन्च, जाणून घ्या किंमत!

Dec 10, 2024 07:12 PM IST

Realme Note 60x: रिअलमीने आपला नवा बजेट स्मार्टफोन रियलमी नोट ६० एक्स लॉन्च केला आहे.

 १२ जीबी रॅम आणि रेनवॉटर टचसोबत रियलमीचा नवा फोन लॉन्च
१२ जीबी रॅम आणि रेनवॉटर टचसोबत रियलमीचा नवा फोन लॉन्च

Realme Smartphones: चीनची स्मार्टफोन कंपनी रियलमीने आपला नवा बजेट स्मार्टफोन रियलमी नोट ६० एक्स लॉन्च केला आहे. धूळ आणि पाण्यापासून फोनचे संरक्षण करण्यासाठी फोनमध्ये युनिसॉक टी ६१२ चिपसेट, आयपी ५४ रेटेड बिल्ड देण्यात आले आहे. हा फोन फिलिपिन्समध्ये लॉन्च करण्यात आला आहे. हँडसेट आर्मरशेल प्रोटेक्शनसह येतो, ज्यामुळे फोन पडल्यावरही तुटणार नाही, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

रियलमी नोट ६० एक्स फिलिपिन्समध्ये ४ जीबी +६४ जीबी स्टोरेज अशा एकमेव पर्यायासह उपलब्ध आहे. या फोनची किंमत ४ हजार ७९९ पीएचपी (म्हणजेच सुमारे ७००० रुपये) ठेवण्यात आली आहे. हा फोन मार्बल ब्लॅक आणि वाइल्डरनेस ग्रीन कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.

रियलमी नोट ६० एक्स: डिस्प्ले

रियलमी नोट ६० एक्स मध्ये ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट, १८० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, ५६० निट्स पीक ब्राइटनेस लेव्हल आणि आय कम्फर्ट मोडसह ६.७४ इंचाचा एचडी+ (७२० बाय १ हजार ६०० पिक्सल) स्क्रीन आहे.

रियलमी नोट ६० एक्स: स्टोरेज

फोनमध्ये युनिसॉक टी ६१२ प्रोसेसर आणि ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आला आहे. रॅम १२ जीबीपर्यंत वाढवता येते. तर, मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २ टीबीपर्यंत स्टोरेज वाढवता येते. हा हँडसेट अँड्रॉइड १४ बेस्ड रियलमी यूआय ५.० सोबत येतो.

रियलमी नोट ६० एक्स: कॅमेरा

रियलमी नोट ६० एक्समध्ये मागील बाजूस ८ मेगापिक्सलचा सेन्सर आणि फ्रंटमध्ये ५ मेगापिक्सलचा सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन रेनवॉटर स्मार्ट टच फीचरला सपोर्ट करतो ज्यामुळे लोक ओल्या हाताने किंवा पावसातही टचस्क्रीन वापरू शकतात. रियलमी नोट ६० एक्स मध्ये यूएसबी टाइप-सी पोर्टद्वारे १० वॅट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह ५ हजार एमएएच बॅटरी आहे. हा हँडसेट धूळ आणि स्प्लॅश रेझिस्टन्ससाठी आयपी ५४ रेटिंगसह येतो.

Whats_app_banner