Upcoming Smartphones: रियलमी आपला नवा स्मार्टफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या या आगामी फोनचे नाव रिअलमी नोट ६० असे आहे. नुकत्याच झालेल्या एका लीकमध्ये या फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स समोर आले होते. आता पॅशनगीझने या फोनच्या लाइव्ह फोटोसह रेंडर्स आणि लाँचिंगची तारीख शेअर केली आहे. रिपोर्टनुसार, रियलमीचा हा फोन ५ सप्टेंबरला जागतिक बाजारात दाखल होईल. ९० हर्ट्झ रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि ५००० एमएएच बॅटरीअसलेल्या या फोनमध्ये कंपनी अनेक उत्तम फीचर्स देणार आहे.
लीक झालेल्या रिपोर्टनुसार, कंपनी या फोनमध्ये ६.७४ इंचाचा आयपीएस एलसीडी पॅनेल देणार आहे. फोनमध्ये देण्यात आलेला हा डिस्प्ले ९० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. रियलमीच्या या फोनमध्ये तुम्हाला ४ जीबी रॅम मिळेल. प्रोसेसर म्हणून कंपनी फोनमध्ये युनिसोक टायगर टी ६१२ चिपसेट देणार आहे.
फोनच्या रियर पॅनेलवर २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देखील पाहायला मिळणार आहे. तर सेल्फीसाठी कंपनी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युअल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यामध्ये मुख्य कॅमेरा ३२ मेगापिक्सलचा असेल.
रियलमीचा हा फोन ५००० एमएएच बॅटरीसह येऊ शकतो. ही बॅटरी १० वॅट चार्जिंगला सपोर्ट करेल. फोनची किंमत ६० ते ७० डॉलर (सुमारे 5 हजार ते 6 हजार रुपये) दरम्यान असण्याची शक्यता आहे.
कंपनीच्या या आगामी सीरिजमध्ये रियलमी १३ आणि रियलमी १३+ या दोन फोनचा समावेश असेल. नव्या डिव्हाइसमध्ये कंपनी शानदार डिस्प्ले देणार आहे. गीकबेंच लिस्टिंगनुसार, रियलमी १३ डायमेंसिटी ६३०० प्रोसेसर आणि रियलमी १३+ डायमेंसिटी ७३०० ई चिपसेटसह सुसज्ज असेल. फोटोग्राफीसाठी रियलमी १३ मध्ये ५० मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. तर, रियलमी १३+ मध्ये कंपनी ८ मेगापिक्सलचा एक्स्ट्रा अल्ट्रावाइड अँगल सेन्सर देणार आहे. फोनमध्ये कंपनी ८० वॅटपर्यंत चार्जिंगसह ५००० एमएएच ची बॅटरी देऊ शकते. रियलमी २९ ऑगस्टरोजी भारतात आपले १३ सीरिजचे फोन लॉन्च करणार आहे.