Realme Upcoming Smartphones: रियलमी या महिन्यात आपली सर्वात शक्तिशाली बॅटरी रियलमी निओ ७ लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. चीनमध्ये ११ डिसेंबरला अधिकृतपणे लॉन्च होणार आहे. गेल्या काही काळापासून कंपनी या नवीन मिड-रेंज फोनला टीज करत आहे. ताज्या लीक झालेल्या माहितीनुसार,नवीन निओ सीरिज हँडसेटमध्ये ७००० एमएएचची बॅटरी देण्यात आली. यामुळे ग्राहकांना सारखे फोन चार्जिंगला लावण्याचे टेन्शन कमी होणार आहे.
रियलमी निओ ७ मध्ये एकदा चार्ज केल्यावर ३ दिवसांची बॅटरी लाइफ मिळते. यात 23 तासांपर्यंत व्हिडिओ प्लेबॅक, 22 तासांपर्यंत मॅप वापर, 89 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक किंवा 14 तासांपर्यंत सलग व्हिडिओ कॉलिंग करता येईल, असे कंपनीने म्हटले आहे. मोठी बॅटरी असूनही हँडसेटमध्ये 8.5 मिमी पातळ बॉडी असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. टीझर इमेजमध्ये गोलाकार कोपऱ्यांसह फोनमधील पंच डिस्प्ले डिझाइन दिसत आहे.
रियलमी निओ ७ मध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ९३००+ चिपसेट असण्याची शक्यता आहे. निओ ७ मध्ये एमोलेड डिस्प्ले आणि ८.५ मिमी थिन बॉडी असण्याची शक्यता आहे. रियलमी निओ ७ साठी कंपनीने टायटन बॅटरी तयार करण्यासाठी निंगडे न्यू एनर्जी सोबत भागीदारी केली आहे. याशिवाय, फोनमध्ये जास्त बॅटरी क्षमता असूनही बॅटरी हलकी राहील. अफवांनुसार, रियलमी निओ 7 मध्ये ८० वॅट सुपरव्हीओसी वायर्ड चार्जिंगसह ७००० एमएएच बॅटरी असेल.
रियलमी निओ ७ ची सुरुवातीची किंमत २ हजार ४९९ चीनी युआन (अंदाजे २९,१०० रुपये) असल्याची पुष्टी झाली आहे. यात २ दशलक्षाहून अधिक अँटुटू स्कोअर आणि धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी आयपी ६८- रेटेड बिल्ड देखील मिळेल.
संबंधित बातम्या