Realme Narzo 70 Turbo 5G Lauched In India: रियलमीने त्यांचा नवा स्मार्टफोन भारतात रियलमी नार्झो ७० सीरिज लॉन्च केला आहे, यात नार्झो ७० एक्स, नार्झो ७० आणि नार्झो ७० प्रो यांचा समावेश आहेत. हा गेमिंग स्मार्टफोन असल्याचे म्हटले आहे. हा फोन बाजारात दाखल झाल्यानंतर मोठी पसंती मिळवेल, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
रियलमी नार्झो ७० टर्बो यलो, टर्बो ग्रीन आणि टर्बो पर्पल या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. ६ जीबी आणि १२८ जीबी, ८ जीबी + १२८ जीबी, १२ जीबी रॅम + २५६ जीबी या तीन वेगवेगळ्या रॅम आणि स्टोरेजमध्ये उपलब्ध आहे. या तिन्ही स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे १६ हजार ९९९ रुपये, १७ हजार ९९९ रुपये आणि २० हजार ९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनच्या खरेदीवर २००० रुपयांचे डिस्काऊंट मिळत आहे.
रियलमी नार्झो ७० टर्बोचा पहिला सेल १६ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता सुरू होईल. हा फोन अॅमेझॉन, रियलमीची अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येणार आहे. इच्छुक ग्राहकांना दिवाळीपूर्वी स्मार्टफोन खरेदी केल्यास दोन हजार रुपयांचा कूपन डिस्काउंट मिळू शकतो.
रियलमी नार्झो ७० टर्बो डायमेंसिटी ७३०० एनर्जी ५ जी चिपसेटसह येतो. फोनमध्ये १२ जीबी पर्यंत LPDDR4X रॅम आणि २५६ जीबी यूएफएस ३.१ स्टोरेज आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर चालतो आणि रियलमी यूआय ५.० वर आहे. यात १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २,००० निट्स पीक ब्राइटनेससह ६.६७ इंचाचा ओएलईडी इस्पोर्ट्स डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ४५ वॅट फास्ट चार्जिंगसह ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी दिर्घकाळ टिकेल.
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेलचा एआय कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये २ मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये १४ जीबीपर्यंत डायनॅमिक रॅम आहे. हा फोन अँड्रॉइड १४ बेस्ड रियलमी यूआय कस्टम स्किनवर चालतो. कंपनी 2 ओएस अपडेट आणि 3 वर्षांच्या सिक्युरिटी पॅचसह येते.