Realme GT 7 Pro: १६ जीबी रॅम, १ टीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज; रियलमी जीटी ७ प्रो लॉन्च!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Realme GT 7 Pro: १६ जीबी रॅम, १ टीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज; रियलमी जीटी ७ प्रो लॉन्च!

Realme GT 7 Pro: १६ जीबी रॅम, १ टीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज; रियलमी जीटी ७ प्रो लॉन्च!

Nov 04, 2024 07:19 PM IST

Realme GT 7 Pro Launched: १६ जीबी रॅम, १ टीबीपर्यंत इंटरनल स्टोरेजसह रियलमी जीटी ७ प्रो जागतिक बाजारात लॉन्च झाला आहे.

रियलमी जीटी ७ प्रो लॉन्च!
रियलमी जीटी ७ प्रो लॉन्च!

Realme GT 7 Pro Price and Specifications: रियलमीने आपला नवा फोन रियलमी जीटी ७ प्रो लॉन्च केला आहे.  कंपनीने नुकताच हा फोन चीनमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन १६ जीबी पर्यंत रॅम आणि १ टीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज पर्यायात लॉन्च करण्यात आला आहे. या फोनची सुरुवातीची किंमत ३६९९ युआन (सुमारे ४३ हजार ८४० रुपये) आहे. चीनमध्ये या फोनची विक्री ११ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. भारतात हा फोन येत्या २६ नोव्हेंबरला लॉन्च होणार आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसर, ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि १२० वॅट फास्ट चार्जिंग देत आहे.  

रियलमी जीटी ७ प्रो: डिस्प्ले

कंपनी या फोनमध्ये २७८०x १२६४ पिक्सल रिझोल्यूशनसह ६.७८ इंचाचा ८ टी एलटीपीओ इको ओएलईडी प्लस डिस्प्ले देत आहे. हा डिस्प्ले १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस लेव्हल ६००० निट्स आहे. 

रियलमी जीटी ७ प्रो: स्टोरेज

रिअलमीच्या फोनमध्ये १६ जीबीपर्यंत एलपीडीडीआर ५ एक्स रॅम आणि १ टीबीपर्यंत यूएफएस ४.० स्टोरेज आहे. प्रोसेसर म्हणून कंपनी फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८ एलिट चिपसेट देत आहे.

रियलमी जीटी ७ प्रो: कॅमेरा

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये ५० मेगापिक्सलचा मेन लेन्ससह ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेन्स आणि ५० मेगापिक्सलचा थ्रीएक्स पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी कंपनी फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देत आहे.

रियलमी जीटी ७ प्रो: बॅटरी

फोनला पॉवर देण्यासाठी यात ६५०० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी १२० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

रियलमी जीटी ७ प्रो: कनेक्टिव्हिटी

ओएसबद्दल बोलायचे झाले तर, रियलमी जीटी ७ प्रो अँड्रॉइड १५ वर आधारित रियलमी यूआय ६.० वर काम करतो. बायोमेट्रिक सुरक्षेसाठी कंपनी फोनमध्ये इन-डिस्प्ले अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर देत आहे. फोनमध्ये तुम्हाला आयपी ६८+आयपी ६९ डस्ट आणि वॉटर रेझिस्टंट रेटिंगही मिळाले आहे. हा फोन मार्स ऑरेंज, स्टार ट्रेल टायटॅनियम आणि व्हाईट या तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी रिलमीच्या अधिकृत वेबसाइटवर भेट द्यावी.

Whats_app_banner