रियलमी जीटी ७ प्रो की वनप्लस १३, कोणता खरेदी करावा? जाणून घ्या दोन्ही फ्लॅगशिप फोनमधील फीचर्स
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  रियलमी जीटी ७ प्रो की वनप्लस १३, कोणता खरेदी करावा? जाणून घ्या दोन्ही फ्लॅगशिप फोनमधील फीचर्स

रियलमी जीटी ७ प्रो की वनप्लस १३, कोणता खरेदी करावा? जाणून घ्या दोन्ही फ्लॅगशिप फोनमधील फीचर्स

Nov 24, 2024 11:26 AM IST

Realme GT 7 Pro vs OnePlus 13: बाजारात उपलब्ध असलेल्या फ्लॅगशिप फोनपैकी रियलमी जीटी ७ प्रो आणि वनप्लस १३ सर्वाधिक चर्चा आहे. या फोनमध्ये मिळणारे फीचर्स ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत.

रियलमी जीटी ७ प्रो की वनप्लस १३, कोणता खरेदी करावा? जाणून घ्या दोन्ही फ्लॅगशिप फोनमधील फीचर्स
रियलमी जीटी ७ प्रो की वनप्लस १३, कोणता खरेदी करावा? जाणून घ्या दोन्ही फ्लॅगशिप फोनमधील फीचर्स (Realme)

flagship Smartphones: येत्या आठवड्यात रियलमी जीटी ७ प्रो आणि वनप्लस १३ सह अनेक फ्लॅगशिप मॉडेल्स लॉन्च होण्याची शक्यता आहे. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसर देण्यात आला आहे, जो मोठ्या प्रमाणात परफॉर्मन्स बूस्ट देण्याचा दावा करतो. रियलमी जीटी ७ प्रो २६ नोव्हेंबरला लॉन्च होत आहे. तर, वनप्लस १३ भारतात कधी लॉन्च होतोय, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही. दरम्यान,  रियलमी जीटी ७ प्रो आणि वनप्लस १३ या स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या फीचर्सची तुलना पाहुयात.

डिस्प्ले:

  • रियलमी जीटी ७ प्रो मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ६००० निट्स पीक ब्राइटनेससह ६.७८ इंचाचा १.५ के ८ टी एलटीपीओ कर्व्ह्ड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. डिस्प्लेमध्ये एचडीआर १० प्लस, डॉल्बी व्हिजन, २ हजार ६०० हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि बरेच काही मिळेल. 
  • वनप्लस १३ मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ४५०० निट्स पीक ब्राइटनेससह ६.८२ इंचाचा २के + एमोलेड डिस्प्ले असू शकतो.  हे जगातील पहिले डिस्प्ले मेट ए++ रेटिंगसह येईल. 

    कॅमेरा:
  • रियलमी जीटी ७ प्रोमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल, ज्यात ५० एमपी प्रायमरी कॅमेरा, ३ एक्स ऑप्टिकल झूमसह ५० एमपी टेलिफोटो लेन्स आणि ८ एमपी अल्ट्रावाइड कॅमेरा असेल. फोनच्या फ्रंटमध्ये १६ मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे. 
  • वनप्लस १३ मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे, ज्यात ५० एमपी मुख्य कॅमेरा,  ३  एक्स ऑप्टिकल झूमसह ५० एमपी टेलिफोटो लेन्सचा समावेश असू शकतो. याशिवाय, या फोनमध्ये ५० एमपी अल्ट्रा-वाइड कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. यात ३२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देखील असू शकतो. 

    परफॉर्मन्स:
  •  परफॉर्मन्ससाठी रियलमी जीटी ७ प्रो आणि वनप्लस १३ हे दोन्ही स्नॅपड्रॅगन ८ एलिट प्रोसेसरने चालतात. भारतात दोन्ही स्मार्टफोनमध्ये १६ जीबी LPDDR5X रॅम आणि १ टीबीपर्यंत यूएफएस ४.० स्टोरेज असण्याची शक्यता आहे. 
  • वनप्लस १३ चायना व्हेरियंटमध्ये २४ जीबी रॅम देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, दोन्ही डिव्हाइसमध्ये एआय फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
     
    बॅटरी:
  •  भारतात रियलमी जीटी ७ प्रोमध्ये ५८०० एमएएच बॅटरी असेल, जी १२० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. 
  • वनप्लस १३ मध्ये १०० वॉट सुपरव्हीओसी फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता आहे. 

किंमत:

  • चीनमध्ये रियलमी जीटी ७ प्रोची सुरुवातीची किंमत ३ हजार ६९९ युआन (अंदाजे ४४ हजार रुपये) होती. 
  • वनप्लस १३ हा स्मार्टफोन ४ हजार ४९९ युआन (५३ हजार रुपये) किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. त्यामुळे वनप्लस १३ हा फोन रियलमी जीटी ७ प्रोपेक्षा महाग होणार आहे.

Whats_app_banner