मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Realme C53: १०८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन अवघ्या १० हजार खेरदी करण्याची संधी

Realme C53: १०८ मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन अवघ्या १० हजार खेरदी करण्याची संधी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 01, 2024 09:46 PM IST

Smartphones Under 10000: नुकताच लॉन्च झालेल्या रिअलमी कंपनीचा नवा स्मार्टफोन अवघ्या १० हजारात लॉन्च करण्यात आला.

Realme C53
Realme C53

Realme C53 Specifications: इलेक्ट्रॉनिक्स कंपनी रिअलमीने त्यांचा नवा स्मार्टफोन रिअलमी सी ५३ काही महिन्यांपूर्वी बाजारात दाखल झाला. दरम्यान, १०८ मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या बजेट स्मार्टफोनला ग्राहकांची मोठी पसंती दर्शवली. यामागचे एकमेव कारण म्हणजे रिअलमी सी ५३ स्मार्टफोनची किंमत १० हजारांपेक्षा कमी आहे. या स्मार्टफोनचा कॅमेरा आयफोनच्या कॅमेऱ्यासारखा दिसतो. तसेच फोनमध्ये ग्राहकांना ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.

हा स्मार्टफोन भारतात ई-कॉमर्स प्लेटफॉर्म फ्लिपकार्टवरून ९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकतात. ही किंमत फोनच्या ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजची आहे. निवडक बँक कार्डद्वारे ग्राहकांना अतिरिक्त सूट मिळत आहे. तसेच या फोनवर एक्स्चेंज ऑफर्स मिळत आहे. एक्स्चेंज ऑफर फोनच्या कंडीशनवर अवलंबून असेल.

बजेट फोनमध्ये ६.७४ इंचाचा एचडी एलसीडी डिस्प्ले देण्यात आला. या फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजपर्यंत रॅम मिळतो. या फोन अॅन्ड्राईड १३ वर आधारित RealmeUI T Edition मिळतो. फोनमध्ये रिअर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला. १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेऱ्यासह ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी १८ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन चॅम्पियन ब्लॅक आणि चॅम्पियन गोल्ड दोन रंगात खरेदी करता येईल.

WhatsApp channel

विभाग