Realme 14 Pro: पाण्यात पडला तरी काय होणार नाही! रिअलमीचा नवा फोन लवकरच येतोय बाजारात
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Realme 14 Pro: पाण्यात पडला तरी काय होणार नाही! रिअलमीचा नवा फोन लवकरच येतोय बाजारात

Realme 14 Pro: पाण्यात पडला तरी काय होणार नाही! रिअलमीचा नवा फोन लवकरच येतोय बाजारात

Dec 27, 2024 01:30 AM IST

Realme 14 Pro Series: रियलमी आता आपली १४ प्रो सीरिज भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. रियलमी १४ प्रो सीरिजमध्ये रियलमी १४ प्रो आणि रियलमी १४ प्रो प्लास या दोन मॉडेल्सचा समावेश असेल.

रिअलमीचा नवा फोन लवकरच येतोय बाजारात
रिअलमीचा नवा फोन लवकरच येतोय बाजारात

Realme Upcoming Smartphones: रिअलमी कंपनी आता आपली १४ प्रो सीरिज लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनी रियलमी १४ प्रो सीरिजवर सतत काम करत आहे. हा फोन जानेवारीमध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे. रियलमी १४ प्रो सीरिजमध्ये रियलमी १४ प्रो आणि रियलमी १४ प्रो प्लस या दोन मॉडेल्समध्ये लॉन्च करण्यात येणार आहे.

लीक झालेल्या माहितीनुसार, फोनचा रंग समोर आला आहे, कंपनी हा फोन ग्रे कलरमध्ये सादर करणार आहे, असे म्हटले जात आहे. तर, रियलमी १४ प्रो सीरिज पर्ल व्हाईट या रंगात लॉन्च केला जाईल. महत्त्वाचे म्हणजे, जेव्हा फोन १६ डिग्री सेल्सिअस तापमानापेक्षा कमी असेल तेव्हा निळा होईल, असेही म्हटले जाते. ग्रे व्हेरियंट चामड्याचा बनलेला आहे आणि टीझर व्हिडिओमध्ये टेक्सचर्ड फिनिश देण्यात आला आहे.

हा फोन आयपी ६६+आयपी६८+आयपी६९ डस्ट आणि वॉटर रेझिस्टंट आहे. आयपी ६९ रेटिंगचा अर्थ असा आहे की डिव्हाइस पाणी, वाफ आणि धूळ सहन करू शकते. डिव्हाइसेस मागील बाजूस क्वाड-कर्व्ह्ड आहेत. यामुळे पकडणे सोपे झाले पाहिजे. आगामी सीरिजमध्ये फक्त १.६ मिमी पातळ बेजल्स मिळतील, अशी पुष्टीरियलमीने केली आहे.

रियलमी १४ प्रो सीरिजमध्ये कोल्ड सेन्सिटिव्ह कलर चेंजिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. जेव्हा तापमान १६ डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी असेल तेव्हा मागील पॅनेल आपला रंग बदलेल. कोल्ड सेन्सिटिव्ह कलर चेंजिंग डिझाइनसह येणारे हे जगातील पहिले डिव्हाइस आहेत.

रियलमी जीटी ६ टी 5G सात हजारांनी स्वस्त

दमदार परफॉर्मन्स असलेला पॉवरफुल फोन घेण्याचा विचार करत असाल तर रियलमी जीटी ६ टी 5G तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. विशेष म्हणजे, अॅमेझॉन इंडियावरील रियलमी ब्रँड स्टोअरच्या अनरॅप योर इमॅजिनेशन डीलमध्ये हा फोन बंपर डिस्काउंटसह खरेदी करता येणार आहे. फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरियंटची किंमत ३० हजार ९९८ रुपये आहे.ऑफरमध्ये हा फोन सात हजारांनी स्वस्त मिळत आहे. कंपनी या फोनवर १५५० रुपयांपर्यंत कॅशबॅक देखील देत आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत २८ हजार ९०० रुपयांपर्यंत कमी करू शकता. एक्स्चेंज ऑफरमध्ये मिळणारी सूट तुमच्या जुन्या फोन, ब्रँड आणि कंपनीच्या एक्स्चेंज पॉलिसीच्या स्थितीवर अवलंबून असेल.

Whats_app_banner