Realme 13 Series: रियलमी १३ सीरिज भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-realme 13 series launched in india at rs 17999 check specifications pricing and availability ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Realme 13 Series: रियलमी १३ सीरिज भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Realme 13 Series: रियलमी १३ सीरिज भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Aug 29, 2024 06:55 PM IST

Realme 13 series launched: रियलमी १३ 5G सीरिज भारतात लॉन्च झाली आहे, ज्यात रिअलमी १३आणि रियलमी १३+ यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक दमदार फीचर्स मिळत आहे.

रियलमी १३ सीरिज भारतात लॉन्च!
रियलमी १३ सीरिज भारतात लॉन्च! (Realme)

Realme 13 series launched in India: चीनी स्मार्टफोन कंपनी रिअलमी कंपनीची रिअलमी १३ सीरिज भारतात लॉन्च झाली आहे, ज्यात १३+ 5G आणि रियलमी १३ 5G या दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. या सीरिजमध्ये दमदार बॅटरी, उत्कृष्ट कॅमेरा आणि भलामोठा डिस्प्ले मिळत आहे.

रिअलमी १३+ 5G: डिस्प्ले

रिअलमी १३+ 5G स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा एमोलेड डिस्प्ले, १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि २००० निट्स पीक ब्राइटनेस आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी ७३००चिपसेटसह सुसज्ज आहे.

रिअलमी १३+ 5G: कॅमेरा

रियलमी १३+ 5G मध्ये 50 एमपी सोनी एलवायटी -600 प्रायमरी कॅमेरा आणि दुसरा 2 एमपी कॅमेरा सेन्सरसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रिअलमी १३+ 5G: बॅटरी

रिअलमी १३+ 5G स्मार्टफोनमध्ये ८० वॅट अल्ट्रा चार्ज सपोर्टसह ५००० एमएएच बॅटरी मिळत आहे. हा स्मार्टफोन १०० टक्के चार्ज केल्यानंतर अधिक काळ त्याची बॅटरी चालते. बॅटरी ८० टक्क्यांहून अधिक ठेवण्याचे आश्वासन देतो. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर आधारित रियलमी यूआय ५.० वर चालतो.

रिअलमी १३ 5G: डिस्प्ले

रिअलमी १३ 5G मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ५८० निट्स पीक ब्राइटनेससह ६.६७ इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

रिअलमी १३ 5G: कॅमेरा

रिअलमी १३ 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ओआयएससह ५० मेगापिक्सल सॅमसंग एस ५ केजेएनएस मुख्य कॅमेरा आणि दुसरा २ एमपी कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

रिअलमी १३ 5G: बॅटरी

रियलमी १३ ५जी स्मार्टफोनमध्ये ४५ वॅट अल्ट्रा चार्ज सपोर्टसह ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. प्लस मॉडेलप्रमाणेच या स्मार्टफोनची बॅटरी दिर्घकाळ टिकते. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित रियलमी यूआय ५.० वर चालतो.

रिअलमी १३ 5G: किंमत

रियलमी १३ 5G च्या बेस मॉडेलची किंमत (८ जीबी रॅम/१२८ जीबी स्टोरेज) १७ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे.

रिअलमी १३+ 5G: किंमत

रियलमी १३ 5G वेगवेगळ्या मेमरी आणि रॅम स्टोरेजच्या तीन मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. ८ जीबी आणि १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत २२ हजार ९९९ रुपये आहे. ८ जीबीसह २५६ जीबी आणि १२ जीबीसह २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २४,९९९ रुपये आणि २६ हजार ९९९ रुपये आहे.

कधी आणि कुठे विक्रीसाठी उपलब्ध?

ग्राहकांना ६ सप्टेंबरपासून रियलमी वेबसाइट, फ्लिपकार्ट आणि इतर स्टोअर्समधून नवीन रियलमी १३ 5G सीरिजचे स्मार्टफोन खरेदी करता येतील. रियलमी १३ 5G डार्क पर्पल आणि स्पीड ग्रीन कलर व्हेरिएंटमध्ये आणि रियलमी १३+ 5G व्हिक्टरी गोल्ड आणि स्पीड ग्रीन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

 

 

 

 

विभाग