Realme: डीएसएलआरसारखी कॅमेरा क्वालिटी; बाजारात येतायेत रिअलमीचे 'हे' दोन जबरदस्त फोन!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Realme: डीएसएलआरसारखी कॅमेरा क्वालिटी; बाजारात येतायेत रिअलमीचे 'हे' दोन जबरदस्त फोन!

Realme: डीएसएलआरसारखी कॅमेरा क्वालिटी; बाजारात येतायेत रिअलमीचे 'हे' दोन जबरदस्त फोन!

Published Jul 30, 2024 02:52 PM IST

Realme 13 Pro 5G series: रिअलमी १३ प्रो सीरिजमध्ये ग्राहकांना डीएसएलआरसारखी कॅमेरा क्वालिटी मिळणार आहे.

 रिअलमी १३ प्रो सीरिजमध्ये डीएसएलआरसारखा कॅमेरा
रिअलमी १३ प्रो सीरिजमध्ये डीएसएलआरसारखा कॅमेरा

Realme Smartphones: चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअलमी आज (३० जुलै २०२४) भारतात रिअलमी १३ प्रो मालिका लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. या लाइनअपमध्ये रिअलमी १३ प्रो आणि रिअलमी १३ प्रो प्लस या दोन स्मार्टफोनचा समावेश असेल. रिअलमी १३ प्रो मालिका लॉन्च करण्यापूर्वी कंपनीने अर्ली ऍक्सेस सेलची घोषणा केली, जी आज संध्याकाळी ०६.०० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. मिड-रेंज फोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी असेल.

या दोन्ही स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना बँक ऑफर दिली जाणार आहे. यातून ग्राहकांना ३००० रुपयांची बचत करता येऊ शकते. याव्यतिरिक्त ग्राहक १२ महिने नो कॉस्ट ईएमआयवर हा फोन खरेदी करू शकतात. ग्राहकांनी हा फोन १२ ऑगस्टपूर् खरेदी केल्यास त्यांना एक वर्षाची अतिरिक्त वॉरंटी आणि ३० दिवसांची मोफत रिप्लेसमेंट हमी देखील मिळेल. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. परंतु, हा मिड रेंज फोन असेल, असे सांगितले जात आहे.

रिअलमी १३ प्रो प्लस फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप मिळणार आहे. ज्याचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सलचा असेल. फोनमध्ये एआय अल्ट्रा क्लॅरिटी, एआय स्मार्ट रिमूव्हल, एआय ग्रुप फोटो एन्हांसमेंट आणि एआय ऑडिओ झूम सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. हा फोन मोनेट गोल्ड आणि एमराल्ड ग्रीन अशा दोन रंगात लॉन्च केला जाईल. फोनमध्ये ५ हजार २०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळू शकते, जी ८० वॅट चार्जिंगला सपोर्ट करेल.

रिअलमी १३ प्रो हा फोन मोनेट गोल्ड, एमेराल्ड ग्रीन, मोनेट पर्पल अशा तीन रंगात भारतात दाखल होईल. फोनच्या अधिकृत मायक्रोसाइटनुसार, या फोनमध्ये सोनी एलव्हायटी- ६०० सेन्सर आहे. प्रो प्लस वेरिएंट प्रमाणेच यात एआय फीचर्स देखील असतील. फोनमध्ये गोरिल्ला ग्लास सेव्हन आय संरक्षण डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये ५ हजार २०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळू शकते, जी ८० वॅट चार्जिंगला सपोर्ट करेल.

किंमत

भारतात रिअलमी १३ प्रोची किंमत २५ हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते. तर, रिअलमी १३ प्रो प्लसची किंमत ३० हजारांपेक्षा कमी असू शकते. या स्मार्टफोनमध्ये अनेक एआय फीचर्सचा मिळत असल्याने हा फोन ग्राहकांच्या मनावर भुरळ घालण्याची शक्यता आहे. कंपनी रिअलमी १३ प्रो 5G मालिकेव्यतिरिक्त रिअलमी वॉच एस २ आणि रिअलमी बड्स टी ३१० टीडब्लूएस देखील लॉन्च करणार आहे.

Whats_app_banner