Realme 13 5G: रियलमीचा 5G फोन उद्या होतोय लॉन्च, ५० मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह 'हे' दमदार फीचर्स मिळणार!-realme 13 5g series to launch on august 29 everything you need to know ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Realme 13 5G: रियलमीचा 5G फोन उद्या होतोय लॉन्च, ५० मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह 'हे' दमदार फीचर्स मिळणार!

Realme 13 5G: रियलमीचा 5G फोन उद्या होतोय लॉन्च, ५० मेगापिक्सेल कॅमेऱ्यासह 'हे' दमदार फीचर्स मिळणार!

Aug 28, 2024 12:25 PM IST

Realme 13 5G Series: रियलमी भारतात २९ ऑगस्ट रोजी रियलमी १३ 5G आणि रियलमी १३ प्लस 5G सीरिजचे स्मार्टफोन लॉन्च करणार आहे.

रिअलमी १३ 5G सीरिज
रिअलमी १३ 5G सीरिज

Realme 13 5G Series to Launch on August 29: चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी रियलमी येत्या २९ ऑगस्ट रोजी रियलमी १३ सीरिज भारतात लॉन्च करत आहे, ज्यात रियलमी १३ 5G आणि रियलमी १३+ 5G अशा दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. लॉन्चिंगपूर्वीच कंपनीने रियलमी १३ 5G सीरिजमध्ये मिळणाऱ्या फीचर्सबाबत महत्त्वाची माहिती शेअर केली आहे.

रियलमी १३ 5G सीरिजमधील दोन्ही स्मार्टफोन रियलमी इंडिया ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि रिटेल आउटलेट्सवर उपलब्ध असतील. या स्मार्टफोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नाही. परंतु, लीक माहितीनुसार, रियलमी स्मार्टफोनच्या बेस व्हेरियंटची किंमत सुमारे १५ हजार रुपये असेल. तर, प्लस व्हेरिएंटची किंमत २० हजारांच्या आसपास असेल.

रियलमी १३ सीरिज 5G: डिस्प्ले

रियलमी स्मार्टफोन स्पीडवेव्ह टेक्सचरसह येईल. यासोबतच फोनला धूळ आणि पाण्यापासून वाचवण्यासाठी यात आयपी ६५ रेझिस्टंट सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन स्पीड ग्रीन आणि व्हिक्टरी ग्रीन रंगात लॉन्च करण्यात येणार आहे. रियलमी १३ 5G आणि रियलमी १३+ 5G मध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट, सेंट्रिक पंच होल कटआऊट आणि एआय आय कम्फर्टसह ओएलईडी डिस्प्ले असेल.

रियलमी १३ सीरिज 5G: स्टोरेज

रियलमीने खुलासा केला आहे की, स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७३०० एनर्जी एसओसी मिळेल. चिपसेटमध्ये २६ जीबी पर्यंत रॅम (व्हर्च्युअल रॅमसह) आणि २५६ जीबी इंटरनल स्टोरेज असल्याची पुष्टी झाली आहे. रियलमी 13+ 5जी मध्ये जीटी मोडसह गेमिंग फीचर्स देखील मिळतील. रियलमी 13+ डिव्हाइस अँड्रॉइड 14 वर आधारित रियलमी यूआय 5 वर चालेल.

रियलमी १३ सीरिज 5G: कॅमेरा

रियलमी १३+ 5G च्या मागील बाजूस ओव्हल कॅमेरा मॉड्यूल असेल, ज्यात एलईडी फ्लॅश देखील असेल. रियलमीने पुष्टी केली आहे की, स्मार्टफोनमध्ये ओआयएससह ५० एमपी सोनी एलवायटी ६०० प्रायमरी कॅमेरा असेल. कंपनीच्या प्लस व्हेरियंटसाठी ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि दोन्ही स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

रियलमी १३ सीरिज 5G: बॅटरी

रियलमीने पुष्टी केली आहे की, रियलमी १३ 5G आणि रियलमी १३+ 5G मध्ये ५००० एमएएच बॅटरी देण्यात येईल, जी ८० वॅट वायर्ड सुपरव्हीओसी फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल, अशी माहिती आहे. 

विभाग