Realme 12 Series Launched: चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी रिअलमीने गेल्या महिन्यात रिअलमी १२ प्रो सीरिज लॉन्च केली होती. त्यानंतर आता कंपनीने रिअलमी १२ सीरिज लॉन्च केली. या सीरिजमध्ये रियलमी १२ प्लस आणि रियलमी १२ हे दोन स्मार्टफोनचा समावेश आहे. रियलमी १२ सीरिजमधील स्मार्टफोनच्या फीचर्स आणि किंमतीबाबत जाणून घेऊयात.
रियलमी १२ प्लसमध्ये १२० हर्ट्झच्या रिफ्रेश रेटसह ६.७ इंचाचा एमोलेड डिस्प्ले आहे. पॅनेल २००० निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करते. यात मीडियाटेक डायमेंसिटी ७०५० 5G प्रोसेसर आहे. १६ जीबी रॅम (८ जीबी + ८ जीबी डायनॅमिक) आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज सपोर्ट आहे. अँड्रॉइड १४ वर आधारित रियलमी यूआय ५.० वर चालतो. मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असून ओआयएससह ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आहे. रियलमी १२ प्लस मध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी असून ६७ वॅट सुपरव्हीओसी चार्जिंग सपोर्ट आहे.
रियलमी १२ मध्ये ९५० निट्स पीक ब्राइटनेससह ६.७ इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६१००+ प्रोसेसर असून १६ जीबी रॅम (८ जीबी + ८ जीबी डायनॅमिक) आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. रियलमी १२ मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात १०८ मेगापिक्सल ३ एक्स झूम पोर्ट्रेट कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
रियलमी १२ प्लसच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत २० हजार ९९९ रुपये आहे. तर, २५६ जीबी स्टोरेज पर्यायाची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. पायोनियर ग्रीन आणि नेव्हिगेटर बेज या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
रियलमी १२ च्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटची किंमत १६ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होते. ८ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत १७ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन ट्वाइलाइट पर्पल आणि वुडलँड ग्रीन या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.
रियलमी १२ सीरिज ६ मार्च रोजी दुपारी ३ वाजता खरेदीसाठी उपलब्ध होईल आणि ब्रँड वेबसाइट, फ्लिपकार्ट तसेच ऑफलाइन रिटेल स्टोअरवर विकली जाईल.