चिनी टेक कंपनी रियलमीने सोमवारी (२९ जानेवारी) भारतात दोन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. पुण्यात झालेल्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये कंपनीने रिअल मी १२ प्रो (Realme 12 Pro) आणि रियल मी १२ प्रो प्लस (Realme 12 Pro+) हे दोन स्मार्टफोन्स बाजारात आणले आहेत.
या फोनमधील खास गोष्ट म्हणजे कंपनीने या दोन्ही फोनमध्ये Sony IMX882 आणि Sony IMX890 कॅमेरा सेंसर वापरले आहेत. सोबतच
रियल मी १२ प्रो प्लसमध्ये, कंपनीने ६४MP टेलिफोटो लेन्स दिला केला आहे. यामुळे फोनचा कॅमेऱ्यात तिप्पट झुम सपोर्ट मिळणार आहे. Realme 12 Pro मध्येही हाच ५०MP कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
रिअल मी १२ प्रो 5G या फोनमध्ये ६.७ इंचाचा फुल HD+ AMOLED वक्र डिस्प्ले आहे, जो १२०Hz रिफ्रेश रेटसह येतो. फोनच्या मागील बाजूस ५०MP Sony IMX890 कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. याशिवाय, फोनमध्ये ५०००mAh बॅटरी आहे, जी ६७W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. या फोनमध्ये Android 14 वर आधारित ऑपरेटिंग सिस्टम वापरण्यात आली आहे.
या फोनच्या मागील बाजूस, पहिला कॅमेरा ५०MP सह येतो आणि दुसरा बॅक कॅमेरा ३२ MP Sony IMX709 सेन्सरसह येतो. याशिवाय या फोनमध्ये ८MP कॅमेरा सेन्सर देखील देण्यात आला आहे.
या फोनचे पहिले मॉडेल ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेजसह येते, याची किंमत २५,९९९ रुपये आहे. फोनच्या दुसऱ्या मॉडेलमध्ये ८ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज आहे. या मॉडेलची किंमत २६,९९९ रुपये आहे.
रिअल मी १२ प्रो प्लस या फोनमध्ये ६.६७ इंचाचा FHD प्लस OLED डिस्प्ले आहे. या फोनमध्ये प्रोसेसरसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 चिपसेट वापरण्यात आला आहे.
या फोनमध्ये ट्रिपल बॅक कॅमेरा सेटअप आहे. पहिला कॅमेरा ६४MP पेरिस्कोप लेन्ससह येतो, तर दुसरा कॅमेरा ५०MP आणि तिसरा कॅमेरा ८MP कॅमेरा सेन्सरसह येतो. याशिवाय यात ३२MP सेल्फी कॅमेरा देखील आहे. हा फोन ५०००mAh बॅटरी आणि ६७W फास्ट चार्जिंगसह येतो.
या फोनचे पहिले मॉडेल ८GB रॅम आणि १२८GB स्टोरेजसह येते, याची किंमत २९,९९९ रुपये आहे. तर या फोनचे दुसरे मॉडेल ८GB रॅम आणि २५६GB स्टोरेजसह येते, या फोनची किंमत ३१,९९९ रुपये आहे. फोनचे तिसरे मॉडेल १२GB रॅम आणि २५६GB स्टोरेजसह येते, याची किंमत ३३,९९९ रुपये आहे.
संबंधित बातम्या