मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol diesel price today : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने फिरायला जाण्यापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर पहा

Petrol diesel price today : मकरसंक्रांतीच्या निमित्ताने फिरायला जाण्यापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर पहा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 15, 2023 09:00 AM IST

Petrol diesel price today : तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथे किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. त्याचवेळी कच्च्या तेलाच्या किंमतींनी ८५ डाॅलर्स प्रति बॅरलचा टप्पा पार केला आहे.

Petrol pump_HT
Petrol pump_HT

Petrol diesel price today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सतत चढ-उतार होत असताना तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. नवीन दरानुसार देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नसून दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. मात्र, वाहतूक खर्च आणि अन्य कारणांमुळे काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल करण्यात आला आहे.

मोठ्या महानगरांबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आणि एक लिटर डिझेल ८९.६२ रुपये आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपयांना विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोल १०२.६३ रुपयांना तर डिझेल ९४.२४ रुपयांना मिळत आहे.

कच्च्या तेलाची किंमत

गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी झेप होती. ब्रेंट क्रूड १.२५ डॉलर किंवा १.४९ टक्क्यांनी वाढून ८५.२८ डॉलर प्रति बॅरलवर आहे. डब्ल्यूटीआय क्रूडची किंमत १.४७ डाॅलर्स किंवा १.८८ टक्क्यांनी वाढून ७९.८६ डाॅलर्स प्रति बॅरल झाली आहे.

देशातील विविध शहरांतील किंमती

शहरपेट्रोल डिझेल
गुडगाव९७.१०८९.९६
भूवनेश्वर१०३.१८९४.७५
चंदीगड९६.२०८४.२६
हैदराबाद१०९.६६९७.८२
जयपूर१०९.६६९४.२६
लखनऊ९६.२०८९.६३
पटना १०८.१२९४.८६
त्रिवेंद्रम १०७.६०९६.४२
नोएडा९६.९२९०.०८

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग