मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol diesel price Today : पेट्रोल डिझेलच्या आजच्या किंमती पहा, दिल्ली ते मुंबईपासून किंमती स्थिर

Petrol diesel price Today : पेट्रोल डिझेलच्या आजच्या किंमती पहा, दिल्ली ते मुंबईपासून किंमती स्थिर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 10, 2023 09:11 AM IST

Petrol diesel price Today : दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलची किंमत अनुक्रमे ९६.७२ रुपये आणि ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ९४.२७ रुपये दराने विकले जात आहे.

petrol diesel price HT
petrol diesel price HT

Petrol diesel price Today : देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. १० जानेवारीसाठीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलची नवीनतम किंमत मुंबई ते दिल्ली अद्ययावत करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता अपडेट केले जातात. देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात आणि त्यानंतर लोकांना पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमतींची माहिती मिळते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल महागात पडण्याचे कारण आहे.

शहरपेट्रोल डिझेल 
मुंबई१०६.३१९४.२७
दिल्ली९६.७२८९.६२
चेन्नई१०२.५३९४.२४
कोलकाता१०६.०३९२.७६
बेंगळूरु१०१.२४८९.८९
लखनऊ९६.५७८९.७६
नोएडा९६.७९८९.९६
चंदीगड९६.२०८४.२६
पटना१०७.२७९४.०४

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग