मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Gold Silver price today : मकरसंक्रातीनिमित्त करा स्वस्तात सोने खरेदी, चांदीचे दर बजेटच्या आतच !

Gold Silver price today : मकरसंक्रातीनिमित्त करा स्वस्तात सोने खरेदी, चांदीचे दर बजेटच्या आतच !

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 15, 2023 09:34 AM IST

Gold Silver price today : आज १५ जानेवारी २०२३ रोजी सोन्या-चांदीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. म्हणजेच किंमत वाढण्याआधी सोने खरेदी करण्याची हीच योग्य संधी आहे. तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या आजचा बाजारभाव काय आहे -

Gold_HT
Gold_HT

Gold Silver price today : सोन्या-चांदीच्या दरात दररोज काही ना काही बदल होत आहेत. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून चांदीचे दर स्थिर आहेत. त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशीही सोन्याचे भाव स्थिर आहेत. अशा परिस्थितीत सोने खरेदी करण्याची ही चांगली संधी आहे. किंमत पुन्हा वाढण्यापूर्वी सोने खरेदीची हीच खरी सुवर्णसंधी ठरावी. चला, तर मग जाणून घेऊया काय आहेत आजचे बाजारभाव.

CTA icon
तुमच्या शहरातील सोन्याचा आजचा भाव पाहण्यासाठी इथं क्लिक करा

आज बाजारभाव असा असेल...

- २२ कॅरेट सोने १ ग्रॅम - ५२१६ रु

- २२ कॅरेट सोने १० ग्रॅम - ५२,१६० रु

- २४ कॅरेट शुद्ध सोने १ ग्रॅम - ५६९९ रुपये

- २४ कॅरेट शुद्ध सोने १०ग्रॅम - ५६९९० रुपये

चांदीचे दर असे असतील

चांदी १ ग्रॅम ७४ रुपये

चांदी १ किलो ७४००० रुपये

सोन्या-चांदीच्या किमती कशा ठरवल्या जातात?

भारतातील सोन्या-चांदीचे दर शेअर बाजारानुसार ठरवले जातात. ट्रेडिंग दिवसाचा शेवटचा बंद हा पुढील दिवसाचा बाजारभाव मानला जातो. यामध्ये विविध शहरांमध्ये आणखी काही शुल्क आकारून दर निश्चित केले जातात.

देशातील विविध शहरांतील सोने चांदीच्या किंमती

शहरसोने २२ कॅरेट (रु.प्रती तोळा)सोने २४ कॅरेट (रु.प्रती तोळा)चांदी (रु.प्रती किलो)
चेन्नई५२९७०५७७८०७४०००
मुंबई५२०१०५६७४०७२७५०
नवी दिल्ली५२१६०५६९९०७२७५०
कोलकाता५२०१०५६७४०७२७५०
बंगळूरु५२०६०५६७९०७४०००
हैदराबाद५२०१०५६७४०७४०००
केरळ५२०१०५६७४०७४०००
पुणे५२०१०५६७४०७२७६०
बडोदा५२०६०५६७९०७२७५०

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग