मराठी बातम्या  /  business  /  ATM Complaints : एटीएमची डोकेदुखी, ग्राहकांच्या रिझर्व्ह बँकेकडे तक्रारीच तक्रारी
ATM_HT
ATM_HT

ATM Complaints : एटीएमची डोकेदुखी, ग्राहकांच्या रिझर्व्ह बँकेकडे तक्रारीच तक्रारी

05 January 2023, 17:05 ISTKulkarni Rutuja Sudeep

ATM Complaints : यूपीआयद्वारे व्यवहार करण्याचे प्रमाण गेल्या चार वर्षांत चांगलेच वाढले आहे. पण तरीही रिझर्व्ह बँकेकडे एटीएमद्वारे पैसे काढण्यासंदर्भात तक्रारींच्या फाईलीच फायली जमा झाल्या आहेत.

ATM Complaints : देशात डिजिटल बँकिंग सेवा वापरण्याचा वेग गेल्या चार वर्षात झपाट्याने वाढला आहे. यूपीए पेमेंटद्वारे ग्राहक सर्रास व्यवहार करताना दिसतात. यामुळे एकेकाळी कुठल्याही वेळी पैसे उपलब्ध करुन देणाऱ्या एटीएमचा वापर कमी झाला आहे. रोखीचे व्यवहार कमी झाल्याने एटीएमचा वापरही कमी झाला आहे. असे असले तरीही, पण तरीही एटीएम सेवेविरोधातच ग्राहकांच्या सर्वाधिक तक्रारी असल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यात डेबिट कार्डसंबंधीच्या सर्वाधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेकडे (RBI) ग्राहकांनी तक्रारींचा पाऊस पाडला आहे. तक्रारींचा सूर आवळल्याने आरबीआयने ही त्याकडे लक्ष दिले आहे.बँक अथवा बँक सेवेसंदर्भात ग्राहकांना येणाऱ्या तक्रारींसाठी बँकिंग लोकपालाची (Banking Ombudsman) स्थापना केली आहे. सध्या नव्या वर्षात या लोकपालांकडे एटीएमच्या वापराबाबत सर्वाधिक तक्रारी नोंदल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.

एटीएम संबंधातील तक्रारींमध्ये डेबिट कार्डाच्या तक्रारींचा सूर अधिक आहे. १ एप्रिल ते ११ नोव्हेंबर २०२१ दरम्यान ग्राहकांनी या तक्रारी दाखल केल्या आहेत. आरबीआयने बुधवारी याविषयीचा अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, केंद्रीय बँकेकडे २०२१-२२ या कालावधीत बँकांच्या विविध सेवांविषयीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एकूण ४,१८,१८४ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तक्रारींमध्ये ९.३९ टक्क्यांची वाढ झाली आहे. बँकिंग लोकपाल कार्यालयाने यातील ३,०४,४९६ तक्रारींचे निवारण केले आहे. यामध्ये १४.६५ टक्के तक्रारी एटीएमसंबंधीच्या आहेत. तर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक बँकिंगच्या १३.६४ टक्के तक्रारी दाखल झाल्या आहेत.

या सर्व तक्रारींमधील 90 टक्के ऑनलाईन तक्रार व्यवस्थापन प्रणाली (CMS) पोर्टल, ई-मेल आणि केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणाली (CPGRAMS) यासह डिजिटल माध्यमातून प्राप्त झालेल्या आहेत.

विभाग