RBI Monetary Policy : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सलग दहाव्यांदा प्रमुख व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं ईएमआय कमी होण्याच्या आशेवर असलेल्या कर्जदारांची निराशा झाली आहे.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण समितीनं घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. रेपो रेट ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, आर्थिक वर्ष २०२५ चा जीडीपी विकास दर आणि महागाईचा अंदाजही कायम ठेवला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) २०२४-२५ या वर्षासाठी ४.५ टक्के चलनवाढीचा अंदाज कायम ठेवला असून दुसऱ्या तिमाहीत ४.१ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.८ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४.२ टक्के राहील. पुढील आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (Consumer Price Index) महागाई दर ४.३ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
यूपीआय 123 पे साठी व्यवहाराची मर्यादा ५ हजार रुपयांवरून १० हजार रुपये करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, यूपीआय लाइट वॉलेटची मर्यादा २ हजार रुपयांवरून ५ हजार रुपये करण्यात आली आहे. यूपीआय लाइटसाठी ही मर्यादा देखील १०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात आली आहे.
> यूपीआय 1 2 3 पेच्या प्रति व्यवहार मर्यादेत ५,००० रुपयांवरून १०,००० रुपयांपर्यंत वाढ
> यूपीआय लाइट वॉलेटच्या व्यवहाराची मर्यादा २,००० रुपयांवरून ५,००० रुपयांवर
> यूपीआय लाइट प्रति व्यवहार मर्यादा १०० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत वाढली
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पतधोरण जाहीर करताना यूपीआयद्वारे कर भरण्याची मर्यादा १ लाख रुपयांवरून ५ लाख रुपये करण्याची घोषणा केली. त्यामुळं यूपीआयच्या माध्यमातून ग्राहकांचे पेमेंट अधिक सुलभ होईल, असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते.
संबंधित बातम्या