मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Repo Rate: RBI चे पतधोरण जाहीर, रेपो दरात पुन्हा वाढ; कर्जे महाग होणार

Repo Rate: RBI चे पतधोरण जाहीर, रेपो दरात पुन्हा वाढ; कर्जे महाग होणार

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 30, 2022 10:31 AM IST

Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पतधोरण जाहीर केले असून पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्यात आली आहे.

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास
आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास (PTI)

Repo Rate: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. पतधोरण बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं. रेपो दरात ५० बेसिस पॉइंटची वाढ केली असून आता रेपो दर हा ५.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. याआधी रेपो दर ५.४० टक्के इतका होता.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. पतधोरण बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं. रेपो दरात ५० बेसिस पॉइंटची वाढ केली असून आता रेपो दर हा ५.९० टक्क्यांवर पोहोचला आहे. याआधी रेपो दर ५.४० टक्के इतका होता.

वाढती महागाई नियंत्रणात आणण्यासाठी आरबीआयने रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. शक्तिकांत दास म्हणाले की, रेपो रेटमधील नवे बदल तात्काळ लागू होतील. आरबीआयने या वर्षात मे महिन्यापासून चौथ्यांदा व्याजदरात वाढ केली आहे. याआधी ऑगस्ट महिन्यातसुद्धा रेपो दर ५० बेसिस पॉइंटने वाढवले होते.

रेपो रेट वाढवल्याने होम लोन, पर्सनल लोन, कार लोन यांसारख्या कर्जाच्या व्याजात वाढ होईल. यामुळे ग्राहकांच्या हफ्त्यात वाढ होणार आहे. देशातील वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआयकडून सातत्याने व्याजदरात वाढ केली जात आहे. अद्यापही देशातील महागाई आरबीआयने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. सध्या महागाई ७ टक्क्यांवर आहे.

WhatsApp channel

विभाग