Home loan : गृहकर्ज फेडल्यानंतर बँका आणि वित्तीय संस्थांना ३० दिवसाच्या आत ग्राहकांना प्राॅपर्टीचे डाॅक्यूमेट्स परत करावे लागतील. रिझर्व्ह बँकेने यासंदर्भात नवी नियमावली जाहीर केली आहे.
बँका आणि वित्तीय संस्थांनी दस्तावेज परत करण्यास दिरंगाई केल्यास ग्राहकांना ५००० रुपयांचा भूर्दंड भरावा लागेल. नवे निर्देश बँका, एनबीएफसी, हाऊसिंग फायनान्स इंस्टिट्यूशन, असेस्ट रिकंस्ट्रक्शन कंपनी, रिजनल बँक आणि को आँपरेटिव्ह बँकांना लागू होतील.
सर्वसाधारणपणे कर्ज घेण्याच्या प्रक्रियेत मालमत्ता तारण ठेवली जाते. त्यामुळे कर्जाची भरपाई केल्यानंतर ही कागदपत्रे ग्राहकांना ३० दिवसांच्या आत परत करणे बंघनकारक राहिल. जूनमध्ये आरबीआयच्या कमिटीने सांगितले की, जर कर्जधारकांच्या मूळ दस्तावेजांची प्रत बँकांनी हरवली तर त्याला भरपाईसहित पेनल्टी द्यावी लागेल.
अलीकडेच रिझर्व्ह बँकेने कर्जाबाबत बँकांना नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. आता होम लोनसंदर्भातील करार ग्राहकाच्याच मातृभाषेत होईल, असे नमूद करण्यात आले. त्यात बँकांना दंड आणि विलंब शुल्काचे नियम ठळक अक्षरात लिहावे लागणार आहेत. पुढील वर्षी १ जानेवारीपासून हे नियम लागू होतील.