मराठी बातम्या  /  बिझनेस  /  RBI Monetary Policy: सणासुदीच्या दिवसात EMI वाढीचा दणका; काय होणार परिणाम? जाणून घ्या

RBI Monetary Policy: सणासुदीच्या दिवसात EMI वाढीचा दणका; काय होणार परिणाम? जाणून घ्या

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Sep 30, 2022 02:08 PM IST

REPO Rate: रिझर्व्ह बॅकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात 0.50 बेसिस पाँईट्स म्हणजे अर्धा टक्का वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जाच्या हफ्त्यांमध्ये वाढ होणार आहे.

सणांच्या दिवसात कर्जे झाली महाग
सणांच्या दिवसात कर्जे झाली महाग

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बॅकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात 0.50 बेसिस पाँईट्स म्हणजे अर्धा टक्का वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या कर्जाच्या हफ्त्यांमध्ये वाढ होणार आहे. ऐन दसरा, दिवाळीच्या मुहूर्तावर झालेल्या या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर नेमके काय-काय परिणाम होणार आहेत, हे जाणून घेऊया.

मागणीवर परिणाम

रिझर्व्ह बॅकेने मे महिन्यातील तिमाहीत दीर्घ कालावधीनंतर पहिल्यांदा रेपो दरात Repo rate 40 बेसिस पाँईट्सची वाढ केली होती. त्यानंतर सलग चार वेळा ही दरवाढ करण्यात आली आहे. अल्प कालावधीत करण्यात आलेल्या या दरवाढीमुळे आर्थिक विकासावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढत्या महागाईमुळे ग्राहक सणांच्या दिवसातील भरघोस खरेदीसाठी हात आखडता घेतील. परिणामी मागणीवर त्याचा परिणाम प्रकर्षाने जाणवेल. वस्तू आणि सेवांचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर ताण पडेल.

गृहकर्ज महाग

रेपो दरवाढीनंर अनेक बॅकांनी कर्जे आणि मुदत ठेव योजनांवरील व्याजदर वाढवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सणावाराच्या निमित्ताने होणाऱ्या गृहखरेदीवरही home loan विपरित परिणाम होणार आहे. बांधकाम क्षेत्रात कच्चा मालाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यात रेपो दर वाढीमुळे गृहकर्जाचे हफ्ते अधिक महाग होणार आहेत. मात्र ग्राहकांच्या मागणीत झालेली वाढ आणि खरेदीची क्षमता यामुळे या क्षेत्रात चित्र आशावादी राहिल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

गुंतवणूकीवर परिणाम

व्याजदर वाढीमुळे बॅका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेणे महाग होते. परिणामी गुंतवणूक आणि बाजारात पैशांचा पुरवठा कमी होतो.

व्याजदर वाढीचे गणित

समजा, ग्राहकाने ७.५५ टक्के दराने २० वर्षांसाठी ३० लाखांचे गृहकर्ज घेतले आहे. तर कर्जाचा सध्याचा हफ्ता 24260 रुपये आहे. २० वर्षात नव्या दराने अंदाजे २८,२२,३०४ रुपये व्याजापोटी द्यावे लागतील. याचाच अर्थ लाख लाखांच्या बदल्यात एकूण ५८,२२,३०४ रुपये भरावे लागणार आहेत.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग