RBI recruitment : पदवीधरांना रिझर्व्ह बँकेत नोकरीची सुवर्णसंधी, ४५० पदांसाठी होणार भरती
RBI Assistant recruitment 2023 : तुम्ही पदवीधर आहात? मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. वाचा संपूर्ण माहिती
RBI Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधरांसाठी उत्तम संधी चालून आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सहाय्यक पदांच्या ४५० जागांसाठी भरती केली जाणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
बँकेची अधिकृत वेबसाईट www.rbi.org वर या संदर्भातील जहिरात् प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसंच, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. आरबीआय सहाय्यक पदांसाठी अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२३ ही आहे. आजपासून ४ ऑक्टोबरपर्यंत परीक्षा शुल्क स्वीकारलं जाणार आहे. २१ ऑक्टोबर २०२३ ते २३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत उमेदवारांची पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे तर मुख्य परीक्षा २ डिसेंबर २०२३ रोजी होईल. पूर्वपरीक्षेत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षा देता येणार आहे. त्याचबरोबर, मुख्य परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना भाषा प्राविण्य चाचणी देखील द्यावी लागणार आहे.
पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेची ५० टक्के गुणांसह बॅचलर पदवी अनिवार्य. ओबीसी, एससी आणि एसटीसाठी ५० टक्के गुणांची अट नाही. फक्त उत्तीर्ण असणं आवश्यक. कम्प्युटरची बेसिक माहिती व वर्ड प्रोसेसिंगचं ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा: किमान २० वर्षे, कमाल २८ वर्षे. १ सप्टेंबर २०२३ पासून वय मोजले जाईल, म्हणजेच उमेदवाराचा जन्म २ सप्टेंबर १९९५ पूर्वी आणि १ सप्टेंबर २००३ नंतर झालेला नसावा. वयोमर्यादेत ओबीसी, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना अनुक्रमे ३ व ५ वर्षांची सूट असेल.
वेतनश्रेणी: मूळ पगार सुरुवातीला २०,७०० रुपये इतका असेल. वेतनश्रेणीनुसार यात वाढ होत जाईल. याशिवाय महागाई, प्रवास असे इतर भत्ते असतील.
अर्ज शुल्क - ४५० रुपये (सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्लुएस) + जीएसटी
एससी, एसटी आणि दिव्यांग - ५० रुपये + जीएसटी
अशी होईल निवड
निवड होण्यासाठी उमेदवारांना तीन ऑनलाइन परीक्षा द्याव्या लागतील. प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा आणि भाषा प्राविण्य चाचणीचा यात समावेश असेल.
परीक्षा पद्धती
- प्राथमिक परीक्षा १०० गुणांच्या १०० प्रश्नांसह एक तासाची असेल. यात इंग्रजी भाषेत ३०, गणिती क्षमता तपासणारे ३५ आणि तार्किक क्षमता तपासणारे ३५ प्रश्न विचारले जातील.
- प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतील.
- मुख्य परीक्षेत २०० गुणांचे २०० प्रश्न विचारले जातील, त्यासाठी १३५ मिनिटांचा वेळ दिला जाईल. यात कारणमीमांसा, इंग्रजी भाषा, गणिती क्षमता, सामान्य ज्ञान आणि कॉम्प्युटरमधून ४०-४० प्रश्न विचारले जातील.
- प्राथमिक आणि मुख्य परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असेल. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा केले जातील.
मुख्य आणि भाषा कौशल्य चाचणी कशी होईल?
मुख्य परीक्षेतील कामगिरीच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांना भाषा प्राविण्य चाचणी (LPT) ला हजेरी लावावी लागेल.
एलपीटी परीक्षा संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेत असेल. या चाचणीत अनुत्तीर्ण होणारे उमेदवार अपात्र ठरतील.
परीक्षेपूर्वी एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांकडून परीक्षेची तयारी देखील करून घेतली जाईल.
विभाग