Fashion Trend: ‘कुर्ता’, ‘बंदगला’ नेसण्याकडे तरुणाईचा कल; रेमंड उघडणार देशभरात १०० ‘एथनिक्स’ स्टोअर्स
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Fashion Trend: ‘कुर्ता’, ‘बंदगला’ नेसण्याकडे तरुणाईचा कल; रेमंड उघडणार देशभरात १०० ‘एथनिक्स’ स्टोअर्स

Fashion Trend: ‘कुर्ता’, ‘बंदगला’ नेसण्याकडे तरुणाईचा कल; रेमंड उघडणार देशभरात १०० ‘एथनिक्स’ स्टोअर्स

Jun 27, 2024 01:55 PM IST

भारतीय फॅशनच्या पेहरावची विक्री गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढते आहे. गेल्या वर्षी रेमंडने ५३ स्टोअर्स उघडले होते. आता या वर्षी १०० हून अधिक एथनिक्स स्टोअर्स उघडण्याची कंपनीची योजना आहे.

भारतीय पारंपरिक वस्त्रांकडे तरुणाईचा कल; रेमंड उघडणार १०० स्टोअर्स
भारतीय पारंपरिक वस्त्रांकडे तरुणाईचा कल; रेमंड उघडणार १०० स्टोअर्स

कपड्यांची फॅशन ही दिवसागणिक बदलत जाणारी फॅशन असते. कपड्यांबाबत भारतीय तरुणांची वेस्टर्न फॅशनला जास्त पसंती असल्याचे दिसून येते. परंतु आता भारतीय फॅशनचे कपडे नेसण्याकडे तरुणांचा कल वाढत चालला असल्याचे दिसून आले आहे. भारतीय पारंपरिक वस्त्रांच्या मागणीत वाढ होत असून भारतातील वस्त्र निर्मिती क्षेत्रातील आघाडीची रेमंड कंपनीने या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. कुर्ता, बंदगला, बुंदी डिझाइनचे भारतीय पारंपरिक फॅशनचे कपडे विक्रीसाठी असलेले एस्क्ल्युजिव ‘एथनिक्स बाय रेमंड’ ब्रँडच्या कपड्यांना तरुण ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. ही मागणी लक्षात घेता देशभरात रेमंड कंपनी आता देशभरात १०० स्टोअर्स उघडण्याचा निर्णय घेतला आहे.  

सध्या ‘एथनिक्स बाय रेमंड’चे देशभरात किती स्टोअर्स आहेत?

रेमंड कंपनीने काही वर्षांपूर्वी उत्सव तसेच विशेष प्रसंगांसाठी नेसण्यासाठी वापरण्यात येणारे भारतीय पारंपरिक कपडे विक्रीसाठी ‘एथनिक्स बाय रेमंड’ ब्रँड लॉंच केला होता. सध्या देशभरात ‘एथनिक्स बाय रेमंड’ चे ५४ हून अधिक स्टोअर्स आहेत. भारतीय पेहरावाच्या कपड्यांना तरुणांकडून मिळणार प्रतिसाद पाहता रेमंड कंपनीने भारतात पारंपरिक वस्त्रांच्या जलदगतीने वाढ होणाऱ्या बाजारपेठेत आपला हिस्सा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 'भारतात भव्य पद्धतीने लग्न समारंभ होत असतात. लोक विविध प्रसंग आणि सण मोठ्या धामधुमीत साजरे करत आहेत. रेमंडने ‘एथनिक्स बाय रेमंड’चा ब्रँडचे स्टोअर्स देशाच्या कानाकोपऱ्यात नेऊन या व्यवसायाचा विस्तार केला आहे' अशी माहिती रेमंड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांनी दिली. सांगितले. ते रेमंडच्या भागधारकांना संबोधित करत होते.

‘एथनिक्स बाय रेमंड’ची किती कोटीची उलाढाल?

‘एथनिक्स बाय रेमंड’च्या व्यवसाय वृद्धी होत असल्याने त्यामुळे रेमंडच्या ‘पार्क्स’ या ब्रँडसह इतर विविध ब्रँडेड कपड्यांच्या सेगमेंटच्या महसूल वाढीत मोठा हातभार लावत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात रेमंडने १५५७ कोटींचे एथनिक्स ब्रँडेड कपड्यांची विक्री केली होती. या सेगमेंटमध्ये रेमंड रेडी टू वेअर, पार्क अॅव्हेन्यू, कलरप्लस आणि पार्क्स या ब्रँडचाही समावेश आहे. दरम्यान, भविष्यात भारतीय पारंपरिक कपड्यांच्या श्रेणीत ग्रोथ होण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे १०० स्टोअर्स उघडण्यात येणार आहे.

रेमंडच्या ‘एथनिक्स बाय रेमंड’ श्रेणीअंतर्गत बुंदी, कुर्ता, बंदगलासाख्या सूक्ष्म आणि नाजूक प्रिंट्सचे काम केलेल्या वस्त्रांचा समावेश होतो. खासकरून विविध उत्सव, लग्नसमारंभ किंवा विशेष प्रसंगी या कपड्यांची मोठ्या प्रमाणावर मागणी होतय. 

Whats_app_banner