
देशाचे दिग्गज व लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री उशिरा निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमारे ५० वर्षे ते टाटा समूहाशी सक्रीयपणे जोडले गेले होते. रतन टाटा यांच्या नेतृत्वाखाली टाटा समूहाला नवी उंची तर मिळालीच, शिवाय नवनवीन प्रकारचे प्रयोगही झाले. नॅनोसारखी लाखाची कार असो किंवा परदेशी व्यवसायाचा विस्तार असो, रतन टाटांनी प्रत्येक निर्णय आत्मविश्वासाने घेतला आणि तो बऱ्याच अंशी योग्य ही सिद्ध केला.
रतन टाटानाव ऐकताच प्रत्येकाच्या मनात विश्वासाची भावना येते.त्यांनीलहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्याच मनात घरकेलं. त्यांचं भारतीय उद्योगक्षेत्रातलं योगदान आणि अनेकांना केलेली मदत ही कधीही विसरता येणारी नाही. ३८०० कोटींचे माल असलेल्या टाटा यांनी कोट्यवधी भारतीयांच्या हृदयातमानाचं आणि आदराचं स्थान निर्माण केलं.
रतन टाटा यांचा जन्म १९३७ मध्ये सुनू आणि नवल टाटा यांच्या घरी झाला. वयाच्या १७ व्या वर्षी ते कॉर्नेल विद्यापीठात (इथाका, न्यूयॉर्क, अमेरिका) गेले. येथे त्यांनी सुमारे ७ वर्षे आर्किटेक्चर आणि इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले. १९६२ मध्ये रतन टाटा यांनी आर्किटेक्चरमधून पदवी घेतली. त्याच वर्षी ते टाटा इंडस्ट्रीजमध्ये पहिल्यांदा सहाय्यक म्हणून रुजू झाले.
जमशेदपूर येथील टाटा इंजिनीअरिंग अँड लोकोमोटिव्ह कंपनीच्या व आता टाटा मोटर्स या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रकल्पात त्यांनी सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर रतन टाटा यांची एका प्रशिक्षण कार्यक्रमासाठी बदली करण्यात आली. टाटा आयर्न अँड स्टील कंपनी किंवा टिस्को (आता टाटा स्टील) च्या जमशेदपूर प्रकल्पात हे हस्तांतरण झाले. १९६५ मध्ये ते टिस्कोमध्ये अभियांत्रिकी विभागात तांत्रिक अधिकारी म्हणून रुजू झाले.
१९६९ मध्ये ते ऑस्ट्रेलियात पोहोचले आणि टाटा समूहाचे स्थानिक प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले. रतन टाटा १९७० मध्ये भारतात परतले आणि सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) शी काही काळ जोडले गेले. १९७१ मध्ये त्यांची नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स (नेल्को नावाने ओळखली जाणारी) या बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक्स उपक्रमाचे प्रभारी संचालक म्हणून नेमणूक झाली.
१९७४ : टाटा सन्सच्या संचालक मंडळात संचालक म्हणून रुजू झाले.
१९८१ : टाटा इंडस्ट्रीजच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती.
१९८६-१९८९ : एअर इंडिया एअरलाइन्सचे अध्यक्ष म्हणून ते जोडले गेले.
रतन टाटा यांना १९९१ मध्ये टाटा समूहाचे अध्यक्ष बनवण्यात आले. चेअरमन झाल्यानंतर त्यांनी टाटा समूहाला एका नव्या उंचीवर नेले.
२५ मार्च १९९१ : रतन टाटा यांनी जेआरडी टाटा यांच्याकडून टाटा सन्सचे अध्यक्ष आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्षपद स्वीकारले. यानंतर टाटा समूहाने आपला व्यवसाय विस्तारला आणि देशात आणि जगात आपले वर्चस्व वाढवले.
२००८: रतन टाटा यांना भारत सरकारने पद्मविभूषण हा देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.
डिसेंबर २०१२ : रतन टाटा यांनी टाटा सन्सच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांची टाटा सन्सच्या मानद अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांनी २०१२ पर्यंत टाटा ग्रुपचे नेतृत्व केले. १९९६ मध्ये टाटांनी दूरसंचार कंपनी टाटा टेलिसर्व्हिसेसची स्थापना केली.
संबंधित बातम्या
