Tata Family Tree : रतन टाटा यांचे टाटा कुटुंबाशी नव्हते रक्ताचे नाते; जाणून घ्या टाटांची संपूर्ण वंशावळ!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata Family Tree : रतन टाटा यांचे टाटा कुटुंबाशी नव्हते रक्ताचे नाते; जाणून घ्या टाटांची संपूर्ण वंशावळ!

Tata Family Tree : रतन टाटा यांचे टाटा कुटुंबाशी नव्हते रक्ताचे नाते; जाणून घ्या टाटांची संपूर्ण वंशावळ!

Updated Oct 10, 2024 08:31 PM IST

Ratan tata Family Tree : टाटा कुटुंबाच्या वंशावळीशी संबंध नसणारे रतन टाटा टाटा ग्रुपचे चेअरमन बनले आणि कंपनीला शिखरावर पोहोचवले. जाणून घेऊया टाटा कुटूंबाची वंशावळ..

जाणून घ्या रतन टाटांची संपूर्ण वंशावळ!
जाणून घ्या रतन टाटांची संपूर्ण वंशावळ!

Ratan Tata Family Tree : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष व भारताचे दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचे ९ ऑक्टोबर रोजी रात्री मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांनी आपल्या कुशल नेतृत्त्वाने टाटा समूहाचा कायापालट करत उद्योगाचा देश-विदेशात विस्तार केला. याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही झाला.

टाटा कुटूंबाच्या वंशावळीशी संबंध नसणारे रतन टाटा टाटा ग्रुपचे चेयरमन बनले आणि कंपनीला शिखरावर पोहोचवले. रतन टाटा यांनी टाटा ग्रुपच्या विस्तारासाठी घाम गाळत रक्ताच्या नात्यालाही मागे टाकले. सिद्धांतवादी रतन टाटा यांनी आपल्या धाडसी निर्णयाने टाटा ग्रुप जगाच्या काना-कोपऱ्यात पोहोचवला.

९ ऑक्टोबर २०२४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालेल्यारतन टाटा यांचा ८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईतील एका पारशी कुटूंबात जन्म झाला होता. रतन टाटा नेवल टाटा आणि सूनी कमिसारीट यांचा मुलगा होते. रतन टाटा १० वर्षाचे असताना त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला.त्यानंतर त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला.

आयुष्यभर अविवाहत राहिलेल्या रतन टाटा यांनी अविवाहित राहण्याचे कारण त्यांच्या आई-वडिलांमधील संबंध असल्याचे म्हटले जाते. मात्र त्यांनी एकदा सांगितले होते की, त्यांना चार वेळा प्रेम झाले मात्र लग्नापर्यंत गोष्ट पोहोचली नाही.

रतन टाटांची संपूर्ण वंशावळ –

नुसेरवानजी टाटा -

नुसेरवानजी टाटा (१८२२-१८८६) हे टाटा कुटुंबाचे प्रमुख होते. त्यांना पाच मुले होती. जमशेदजी टाटा,रतनबाई टाटा,मानेकबाई टाटा,वीरबाईजी टाटा आणि जेरबाई टाटा. नुसेरवानजी यांचे पुत्र जमशेदजी टाटा यांनी टाटा समूहाची स्थापना केली.

जमशेदजी टाटा -

जमशेदजी टाटा (१८३९-१९०४) हे टाटा समूहाचे संस्थापक आहेत. त्यांना “भारतीय उद्योगाचे जनक” म्हणून संबोधले जाते. त्यांना तीन मुले होती. सर दोराबजी टाटा,धुनबाई टाटा आणि सर रतन टाटा.

सर दोराबजी टाटा -

सर दोराबजी टाटा (१८५९-१९३२) हे जमशेदजींचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यांना मूलबाळ नव्हते आणि त्यांनी कुटुंबाचा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांचे बरेच आयुष्य समर्पित केले.

रतनजी टाटा (१८७१-१९१८)
जमशेदजी टाटायांचे लहान मुलेरतनजी टाटा यांनी टाटा समूहाच्या विस्तारात महत्वपूर्ण भूमिका निभावली. टाटाच्या कॉटन आणि टेक्सटाइल बिझनेस वाढवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.

जेआरडी टाटा (१९०४-१९९३) -
रतनजी टाटा आणि फ्रांसीसी महिला सुजैन यांचा मुलगा जेआरडी टाटा५० वर्षाहून अधिक काळटाटा समूहाचे चेयरमन होते. टाटा एअरलायन्सची स्थापना जेआरडी टाटा यांनी केली. त्यानंतर ही कंपनी सरकारने अधिगृहित केली व त्याला एअर इंडिया नाव दिले. टाटा समूहाच्या विविध क्षेत्रात विस्तारात जेआरडी टाटांची मोठी भूमिका होती.

नवल एच. टाटा

नवल एच. टाटा (१९०४ – १९८९) हे सर रतन टाटा आणि नवजबाई सेट यांचे दत्तक पुत्र होते. नवल टाटा यांनी सूनू कमिसरिअटशी लग्न केले. त्यांना रतन टाटा आणि जिमी टाटा ही दोन मुले झाली. रतन टाटा १० वर्षांचे असताना नवल आणि सूनू यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नवल यांनी दुसरे लग्न केले. त्यांना नोएल टाटा नावाचा मुलगा झाला.

 

नोएल टाटा रतन टाटांचा होणार उत्तराधिकारी?

रतन टाटा त्यांचा भाऊ जिमी टाटा आणि त्यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्यासोबत मोठे झाले.आई वडिलांच्याघटस्फोटानंतर रतन आणि जिमी यांचे संगोपन त्यांच्या आजी नवजबाई सेट यांनी केले. जिमी टाटा यांनी व्यवसायात न घेता वेगळ्या क्षेत्रात करिअर केलं. तर त्यांचा सावत्र भाऊ नोएल टाटा टाटा ग्रुपमध्ये सक्रीय असून कंपनीची धुरा त्यांच्याकडेच जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Whats_app_banner