रतन टाटांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार; नरिमन पॉईंट येथील एनसीपीए इथं अंत्यदर्शन घेता येणार
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  रतन टाटांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार; नरिमन पॉईंट येथील एनसीपीए इथं अंत्यदर्शन घेता येणार

रतन टाटांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार; नरिमन पॉईंट येथील एनसीपीए इथं अंत्यदर्शन घेता येणार

Updated Oct 10, 2024 08:49 AM IST

Ratan Tata last Rituals : प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज दुपारी ३.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

रतन टाटा यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर! एनसीपीए नरिमन पॉईंट येथे अंत्यदर्शनासाठी आणले जाणार पार्थिव
रतन टाटा यांच्या मृत्यूचं कारण आलं समोर! एनसीपीए नरिमन पॉईंट येथे अंत्यदर्शनासाठी आणले जाणार पार्थिव

Ratan Tata Death: प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं बुधवारी वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे उद्योगविश्वासह् संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. यामुळे त्यांना मुंबईच्या ब्रिज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांच्या पार्थिवावर आज दुपारी ३.३० वाजता वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्या पूर्वी नरीमन पॉइंट येथे एनपीसीए येथे त्यांचे पार्थिव १०.३० वाजता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.

रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मोठे दूरदृष्टी असलेले उद्योजक, थोर समाजकारणी, देशप्रेमी दानशूर उद्योगपती म्हणून रतन टाटा यांची ओळख होती. देशातील तरुणांसाठी ते प्रेरणास्थान होते. त्यामुळे त्यांच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाने शोक व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र, झारखंड येथे एक दिवसांचा दुखवटा जाहीर

रतन टाटा यांच्या निधनामुळे महाराष्ट्रात आणि झारखंड येथे एक दिवसाचा दुखवटा जाहिर करण्यात आले आहे. आज असलेले बहुतांश कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आज दुपारी ३.३० वाजता वरळी येथील एका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्या पूर्वी त्यांचे पार्थिव हे आज १०.३० वाजता नरीमन पॉइंट येथील एनसीपीए येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहे. यावेळी अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार असल्याने या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

रतन टाटा यांचा मृत्यूचे नेमके कारण काय?

रतन टाटा हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती ही चिंताजनक होती. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना सोमवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र, बुधवारी रात्री अचानक रक्तदाब कमी झाल्यामुळे रतन टाटा यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

Whats_app_banner