भारतीय उद्योगविश्वातील रत्न हरपलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  भारतीय उद्योगविश्वातील रत्न हरपलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

भारतीय उद्योगविश्वातील रत्न हरपलं! 'पद्मविभूषण' रतन टाटा यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Oct 10, 2024 12:51 PM IST

Ratan Tata Passed Away : देशातीलप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटासन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतीलब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रतन टाटा
रतन टाटा

Ratan Tata Passed Away :देशातीलप्रसिद्ध उद्योगपती आणि टाटासन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतीलब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर अतिदक्षता विभागातउपचार सुरू होते. रतन टाटा ८६ वर्षाचे होते व ७ ऑक्टोबरला ते नियमित तपासणीसाठीब्रीच कँडीरुग्णालयात गेले होते. मात्र त्यांची प्रकृतीचिंताजनक बनली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्यावर उपचार सुरु असताना इंटेसिव्ह केअर युनिटमध्ये ठेवण्यात आलं होतं. रतन टाटा यांच्या निधनामुळे संपूर्ण देशासह उद्योगविश्वावर मोठी शोककळा पसरली आहे.

रतन टाटा यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक असून त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरूहोते. काही दिवसांपूर्वीखुद्द रतन टाटा यांनीच त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली होती. मात्र पुन्हा एकदा त्यांची प्रकृती चिंताजनक बनली होती. ब्रीच कँडी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेऊन होते.

याआधी सोमवारी रतन टाटा यांची तब्येत बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या. रतन टाटा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. मात्र, रतन टाटा यांनी या बातम्यांना अफवा म्हणत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिलं- हे दावे निराधार आहेत. सध्या वयोमानाशी संबंधित आजारांमुळे माझी वैद्यकीय तपासणी सुरू आहे. वयोमानानुसार नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल असल्याचे व यात काळजी करण्यासारखे काहीही नसल्याचे रतन टाटा यांनी म्हटले होते.

रतन टाटा यांनी मार्च १९९१ ते डिसेंबर २०१२ या काळात टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून टाटा समूहाचे नेतृत्व केले. परदेशात शिक्षण पूर्ण केल्यानंतर रतन टाटा प्रथम टाटा समूहाच्या कंपनी टाटा इंडस्ट्रीजमध्ये सहाय्यक म्हणून रुजू झाले. यानंतर त्यांनी काही महिने जमशेदपूर येथील टाटाच्या प्लांटमध्ये प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रतन टाटांनी आपल्या जबाबदाऱ्या सांभाळायला सुरुवात केली. २००८ मध्ये रतन टाटा यांना भारत सरकारने पद्मविभूषण या देशातील दुसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले.

Whats_app_banner