बाईक टॅक्सी व ऑटो-रिक्षा सेवेसाठी प्रसिद्ध रॅपिडोने आता कॅब व्यवसायात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे. सध्या तरी या कॅब्सची सेवा दिल्ली, बंगळुरू आणि हैद्राबाद या मेट्रो शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे. बाईक टॅक्सीमध्ये ६० टक्के मार्केट शेअर असलेल्या रॅपीडोने आता एक लाख गाड्यांसोबत कॅब सेवासुद्धा सुरू केलेली आहे.
बाइक टॅक्सीमध्ये ६० टक्के बाजार हिस्सेदारी बरोबरच रॅपिडोने कॅब्सच्या ऑल इंडिया लाँचसोबत फूटस्टेप्सला एक्सटेंड केले आहे. त्यामध्ये १ लाख वाहनांना सुरुवातीला आपल्या ताफ्यात सामील केले आहे.
कंपनीने स्पष्ट केले आहे की, या कॅब्सच्या चालकांकडून सुरुवातीला कोणतेही कमिशन घेतले जाणार नाही. मात्र रॅपीडोच्या चालकांना किमान सबस्क्रीप्शन फी भरावी लागणार आहे. रॅपीडो अॅपचा वापर करून जेव्हा कॅबचालक १० हजार रुपये कमावेल तेव्हा त्याला त्यावर ५०० रुपये इतकी सबस्क्रीप्शन फी भरावी लाभणार आहे, असे या कंपनीने सांगितले आहे.
रॅपिडोचे सह-संस्थापक पवन गुंटुपल्ली यांनी म्टले की, देशभरात आमच्या बाइक टॅक्सी आणि ऑटो सेवेच्या यशानंतर आम्ही रॅपिडो कॅब्स संपूर्ण भारतात सुरू करणार आहेत. आमचा इनोवेटिव SaaS-आधारित प्लेटफ़ॉर्म एग्रीगेटर्स कमीशन बेस्ड असून चालकांसाठी पारंपरिक कमीशन प्रणालीत क्रांतिकारी बदल आणणारा आहे.