Ram Navami Holiday : राज्यसह उद्या देशभरात रामनवमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. रामनवमी निमित्त अनेक शहरात बँका या बंद राहणार आहेत. तर काही ठिकाणी सुरू राहणार आहेत. नेमक्या कोणत्या शहरात बँका सुरू राहणार आहेत. या बद्दल अनेक विचारत असल्याने या बद्दल माहिती असणे गरजेचे आहे. राज्यात उद्या बँका बंद राहणार आहेत. तर देशातील काही शहरात सुट्टी तर काही ठिकाणी बँक सुरू राहणार आहेत. आरबीआयने या बाबत त्यांच्या संकेत स्थळावर माहिती दिली आहे.
सर्व सामान्य नागरिकांना रोज बँकेशी संबंधित व्यवहार करावे लागतात. बँकेत कॅश भरणे अथवा काढणे. नवे खाते उघडणे. लोन हप्ते भरणे. नवे लोंन घेणे या सारखी कामे करावी लागतात. यातील काही कामे ही आज ऑनलाइन होऊ शकतात. तर काही कामांना प्रत्यक्ष बँकेत जाणे जरुरीचे असते. मात्र, उद्या राम नवमी असल्याने बँक बंद राहणार की सुरू राहणार या बाबत अनेकांना शंका आहे. राज्याचा विचार केला तर उद्या १७ एप्रिल रोजी बँका बंद राहणार आहे. या सोबतच देशभरातील अनेक राज्यांमध्ये देखील बँकांना राम नवमीची सुट्टी देण्यात आली आहे. या बाबत आरबीआय ने त्यांच्या संकेत स्थळावर बँक हॉलिडे निमित्त माहिती जारी केली आहे. काही राज्यांमध्ये राम नवमीच्या निमित्ताने उद्या बुधवारी (दि १७) ला सुट्टी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी बँका सुरू राहणार आहेत.
देशात अनेक राज्यात विविध सण साजरे केले जातात. यामुळे राज्यानुसार सुट्ट्या देखील भिन्न असतात. गणेशोत्सव महाराष्ट्रात साजरा केला जातो. त्यावेळी इतर राज्यात ही सुट्टी नसते. तर राम नवमी हा दिवस भगवान रामाच्या जयंती म्हणून देशभरात विविध शहरात साजरा केला जाणार असल्याने अनेक शहरात या निमित्त सुट्टी देण्यात आली आहे.
आरबीआयच्या यादीनुसार उद्या राम नवमी निमित्त मुंबई, नागपूर, पाटणा, रांची, अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा), जयपूर, कानपूर, लखनौ, शिमला येथे बँका बंद राहतील.
त्यामुळे उद्या बॅंकाची कामे ही प्रामुख्याने मोबाईल अॅप किंवा वेबसाइद्वारे ऑनलाइन पद्धतीने करावी असे आवाहन करण्यात आले आहे. एप्रिल महिन्यात एकूण १७ दिवस बँक बंड राहणार आहेत. निम्मा महिना संपला आहे. या पूर्वी देखील सुट्ट्या झाल्या आहेत. आता यापुढे २० एप्रिलला आगरतळा येथे बँकेला सुट्टी राहील. तर २१ एप्रिलला रविवारमुळे देशातील बँका बंद राहतील. २७ एप्रिलला चौथ्या शनिवारमुळे देशभरात बँका बंद राहणार आहे. तर २८ एप्रिलला रविवारमुळे बँका बंद राहणार आहेत.
संबंधित बातम्या