एका शेअरवर एक शेअर मोफत देणार कंपनी, तुमच्याकडं आहे का शेअर? लगेच चेक करा!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  एका शेअरवर एक शेअर मोफत देणार कंपनी, तुमच्याकडं आहे का शेअर? लगेच चेक करा!

एका शेअरवर एक शेअर मोफत देणार कंपनी, तुमच्याकडं आहे का शेअर? लगेच चेक करा!

HT Marathi Desk HT Marathi
Dec 07, 2024 11:00 AM IST

Rajeshwari Cans Bonus Issue : राजेश्वरी कॅन्स लिमिटेड या कंपनीनं बोनस शेअरची घोषणा केली असून त्यासाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. काय आहे ही रेकॉर्ड डेट?

राजेश्वरी कॅन्स लिमिटेडने बोनस शेअर्सची विक्रमी तारीख जाहीर केली आहे.
राजेश्वरी कॅन्स लिमिटेडने बोनस शेअर्सची विक्रमी तारीख जाहीर केली आहे.

Bonus Share News in Marathi : बोनस शेअर्स देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राजेश्वरी कॅन्स लिमिटेडनं बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. कंपनी एक शेअर मोफत देत आहे.

राजेश्वरी कॅन्स यांनी काल म्हणजेच ६ डिसेंबर रोजी शेअर बाजाराला या संदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, १० रुपये अंकित मूल्य (Face Value) असलेल्या कंपनीच्या प्रत्येक शेअरवर एक शेअर बोनस म्हणून दिला जाईल. या बोनस शेअरसाठी कंपनीनं मंगळवार, १९ डिसेंबर ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. या बोनस शेअरचा लाभ घ्यायचा असेल तर गुंतवणूकदारांना सोमवार, १८ डिसेंबरपर्यंत हा शेअर खरेदी करावा लागणार आहे.

पहिलाच बोनस शेअर

राजेश्वरी कॅन्स लिमिटेडचा हा पहिलाच बोनस इश्यू आहे. कंपनीनं यापूर्वी एकदा लाभांश दिला होता. बीएसईच्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर २०२२ मध्ये कंपनीनं पहिल्यांदा एक्स-डिव्हिडंड म्हणून व्यवहार केला होता. तेव्हा कंपनीनं एका शेअरवर ०.२५ रुपये लाभांश दिला होता.

शेअर बाजारात कंपनीची कामगिरी कशी?

राजेश्वरी कॅन्सच्या शेअरला शुक्रवारी लोअर सर्किटचा फटका बसला. ५ टक्क्यांच्या घसरणीनंतर कंपनीचा शेअर बीएसईवर ५५२.६५ रुपयांवर बंद झाला. गेल्या तीन महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत २३.७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर ६ महिन्यांत कंपनीच्या शेअरच्या किंमतीत ३२८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीनं पोझिशनल गुंतवणूकदारांना २६८ टक्के परतावा दिला आहे. राजेश्वरी कॅन्सच्या शेअरची किंमत ३ वर्षात २५३१ टक्क्यांनी वाढली आहे. या काळात सेन्सेक्समध्ये ४३.४९ टक्क्यांची वाढ झाली आहे.

कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७०५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १०५ रुपये प्रति शेअर आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner