Ruma Devi Story: राजस्थानी महिला रुमा देवी सध्या देशभरात चर्चेत आहे. रुमा देवींचे बालपण बाडमेर जिल्ह्यातील मंगळा बेरी गावात खूपच हलाखीच्या परिस्थितीतीत गेले. लग्नानंतरही तिच्या आयुष्यात फारसा फरक पडला नाही. सासरीच्या दारिद्र्य पाचवीला पुजलेले होते. जीवनात खूप संघर्ष केलेल्या व आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिलेल्या रुमा देवी यांनी असे यश मिळवले की, आपले आयुष्य तर बदललेच शिवाय बाडमेर जिल्ह्यातील ३० हजार महिलांच्या हाताला काम दिले. महिलांना एक प्रकारे वर्क फ्रॉम होम दिले. रूमा देवी राजस्थान सरकारच्या ४५ लाख महिलांचा समावेश असलेल्या आजीविका प्रकल्पाची ब्रँड एम्बेसेडर आहे.
भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या बाडमेरच्या महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देश्याने १९९८ साली ग्रामीण विकास चेतना संस्थेने एनजीओ सुरू केली होती. त्याची वर्तमान अध्यक्षा रूमा देवी आहेत. त्याचबरोबर भारतातील रूमा देवी फाउंडेशन आणि अमेरिकेतील होप फॉर वुमेन युएसएच्या संचालिकाही आहेत. रुमा देवी यांना महिला व बाल विकास मंत्रालयाद्वारे महिलांना दिला जाणारा भारतातील सर्वोच्च नागरिक पुरस्कार "नारी शक्ति पुरस्कार" ८ मार्च २०१९ रोजी रुमा देवी यांना तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते दिला गेला. त्याचबरोबर जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात रूमा देवी यांना १५ फेब्रुवारी २०२० रोजजी अमेरिकेत १७ व्या वार्षिक भारत संमेलनात प्रमुख वक्त्या व पॅनलिस्ट म्हणून आमंत्रित केले होते.
रूमा देवी यांनी सोशल मीडियावर आपल्या संघर्षमय जीवनातील दिवसांची कहाणी व काही फोटो शेअर केले आहेत. एकेकाळी रूमा देवी आपल्या हाताने बनवलेले हँडीक्राफ्ट सामान प्रदर्शनात ठेवण्यासाठी ट्रेनच्या लोकल डब्यातून प्रवास करत होते. आठवीपर्यंत शिक्षण झालेल्या रूमा देवीने जवळपास सर्व देशांत प्रवास केला असून अमेरिकेतील हार्वर्ड यूनिवर्सिटीत महिला सशक्तिकरण विषयावर व्याख्यानही दिले आहे.
२७ डिसेंबर २०२४ रोजी फेसबुक पेजवर स्वत:चा जुना फोटो शेअर करत रूमा देवी यांनी लिहिले की, जशी कालचीच गोष्ट असावी, १५ वर्षापूर्वी राजधानी दिल्लीत हा फोटो काढला होता. ट्रेनच्या लोकल डब्यात गटरी भरून हँडीक्राफ्ट सामान गेऊन लोधी गार्डनजवळ भरलेल्या प्रदर्शनात गेले होते.
रूमा देवी यांनी पुढे म्हटले की, त्या काळात जो आनंद मिळत होता, तसा अनुभव आज जगातील मोठ्यात मोठ्या प्लेटफॉर्मवरही मिळत नाही. संघर्षमय काळात लहान सहान यशही जगण्याची नवीन उमेद देत असतात. त्यावेळी यशही अनोख्या पद्धतीचे असे. भविष्याचे काही नियोजन नाही, काही पूर्व निर्धारित लक्ष्य नाही, केवळ जे वर्तमान आहे, त्यातच जगावे लागत होते. ही वेगळी गोष्ट आहे की, काळाबरोबर नवीन यश व नवे लक्ष्य मिळत गेले. जर आपण वर्तमानात जगत राहिलो तरी लक्ष्य आपोआप मिळत जाते.
रूमा देवींची एनजीओ ग्रामीण विकास चेतना संस्थेचे विक्रम सिंह यांनी सांगितले की, रूमा देवी यांनी जो फोटो शेअर केला आहे, तेव्हा त्यांनी हँडीक्राफ्ट उत्पादन निर्मितीस सुरुवात केली होती. ती त्यांच्या उत्पादनाचे तिसरेच प्रदर्शन होते. आता रूमा देवी अमेरिका, ब्रिटन, सिंगापूर, जर्मनी आणि दुबई सारख्या १५ देशांमध्ये आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन भरवतात त्याचबरोबर फॅशन शोही आयोजित करत असतात.
विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार रूमा देवींनी आपल्या एनजीओच्या माध्यमातून बाडमेर जिल्ह्यातील अनेक गावातील जवळपास ३० हजार महिलांना हस्तशिल्पाचे प्रशिक्षण दिले आहे. या महिलांना मास्टर ट्रेनरच्या माध्यमातून घरबसल्या हस्तशिल्प निर्मिती आणि बाजारात पोहोचवण्याचे प्रशिक्षण दिले जाते. दिवसभर काम करणारी अशिक्षित महिलाही दरमहिना ७ ते १५ हजार रुपयांची कमाई करते.
या महिलांना त्यांच्या गावातच त्यांचाच गट बनवून १५ दिवसांचे प्रशिक्षण दिले जाते. संपूर्ण प्रशिक्षण मोफत दिले जाते तसेच काही महिलांना प्रशिक्षणादरम्यान भत्ताही दिला जातो. बाडमेरसोबतच शेजारच्या बीकानेर आणि जैसलमेर जिल्ह्यातील महिलाही रूमा देवींशी संपर्क करून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवत आहेत.
संबंधित बातम्या