MDH and Everest Masale : मसाले उद्योगात आघाडीचे नाव असलेल्या देशातील प्रसिद्ध एमडीएच व एव्हरेस्ट मसाल्यांच्या गुणवत्तेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. यावेळी दोन्ही कंपन्यांच्या मसाल्यांचे भारतातील राजस्थानमध्ये घेतलेले नमुने संशयास्पद आढळले आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या दोन कंपन्यांच्या मसाल्यांचे नमुने तपासल्यानंतर ते खाण्यासाठी अयोग्य असल्याचे आढळले आहे.
वरिष्ठ आरोग्य अधिकारी शुभ्रा सिंग यांनी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे. त्यात राजस्थानने अनेक मसाल्यांच्या नमुन्यांची चाचणी केली आणि त्यात एव्हरेस्ट मसाल्यांचे मिश्रण तसेच आणखी दोन प्रकारचे मसाले तपासण्यात आढळले. यात एमडीएच मसाले असुरक्षित आढळले तर एमडीएच आणि एव्हरेस्ट मासल्यांची एक बॅच ही गुजरात, हरियाणामध्ये बनवण्यात आली असून अशा परिस्थितीत दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांनी या मसाल्याची तातडीने तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. हे पत्र सार्वजनिक नाही परंतु रॉयटर्सने या पत्रासंदर्भात वृत्त दिले आहे. तथापि, शुभ्रा सिंह आणि FSSAI कडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
अन्न सुरक्षा आयुक्त इक्बाल खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणीदरम्यान एमडीएच, एव्हरेस्ट व्यतिरिक्त गजानंद, श्याम, शीबा ताज या प्रसिद्ध कंपन्यांचे मसाले 'असुरक्षित' आढळले आहेत. त्यांनी सांगितले की, तपासणीत 'एमडीएच' कंपनीच्या गरम मसाल्यात 'ॲसिटामीप्रिड', 'थायमेथोक्सम', 'इमिडाक्लोप्रिड', 'ट्रायसायकल', भाजी मसाल्यात 'प्रोफेनोफॉस' आणि चना मसाल्यात, श्याम कंपनीच्या गरम मसाल्यात 'ॲसिटामीप्रिड' आढळून आले आहे. मसाला, शीबा फ्रेश कंपनीच्या रायता मसाल्यात 'थियामेथोक्सम' आणि 'ॲसिटामीप्रिड', गजानंद कंपनीच्या पिकल मसाल्यात 'इथिओन' आणि एव्हरेस्ट कंपनीच्या जिरे मसाल्यात 'ॲझोक्सीस्ट्रोबिन' आणि 'थायमेथोक्सम पेस्टिसाइड/कीटकनाशक' आढळून आले. निर्धारित प्रमाणापेक्षा या पदार्थांचे मासल्यातील प्रमाण जास्त असून ते आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते.
५ एप्रिल रोजी, हाँगकाँगचे अन्न सुरक्षा नियामक केंद्र अन्न सुरक्षा (CFS) ने सांगितले की दोन भारतीय ब्रँडच्या विविध कॅन केलेला मसाल्यांच्या उत्पादनांच्या नमुन्यांमध्ये परवानगीयोग्य मर्यादेपेक्षा जास्त कीटकनाशक 'इथिलीन ऑक्साईड' आढळले आहे. ग्राहकांनी ही उत्पादने खरेदी करू नयेत असे सांगितले आहे. CFS आदेश पाहता, सिंगापूर फूड एजन्सीने उत्पादने परत पाठवण्याचे आदेश दिले.
या उत्पादनावर घातली बंदी : एव्हरेस्ट फिश करी मसाला, MDH मद्रास करी पावडर (मद्रास करीसाठी मसाला मिक्स), MDH सांबार मसाला मिश्रित मसाला पावडर, आणि MDH करी पावडर मिश्र मसाला पावडर. यानंतर भारतातही मसाल्यांच्या काही कंपन्या देखील रडारवर आहेत.