सरकारी रेल्वे कंपनीला मोठा झटका! तिमाही नफ्यात तब्बल १८ टक्क्यांची घट
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  सरकारी रेल्वे कंपनीला मोठा झटका! तिमाही नफ्यात तब्बल १८ टक्क्यांची घट

सरकारी रेल्वे कंपनीला मोठा झटका! तिमाही नफ्यात तब्बल १८ टक्क्यांची घट

HT Marathi Desk HT Marathi
Nov 08, 2024 10:23 AM IST

Ircon International Share Price : इरकॉन इंटरनॅशनलने सप्टेंबर तिमाहीतील निकाल जाहीर केले असून कंपनीच्या निव्वळ नफ्यात १८ टक्क्यांची घट झाली आहे.

इरकॉन इंटरनॅशनल
इरकॉन इंटरनॅशनल (Lakshmi)

Ircon International Share Price : सरकारी रेल्वे कंपनी इरकॉन इंटरनॅशनलने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. रेल्वे क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनीसाठी सप्टेंबर तिमाही चांगली नव्हती. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात १८ टक्क्यांची घट झाली आहे.

जुलै ते सप्टेंबर या कालावधीत इरकॉन इंटरनॅशनलचा निव्वळ नफा २०६ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा २५०.७० कोटी रुपये होता. कंपनीच्या महसुलातही घट झाली आहे. परिचालन महसूल १९.३ टक्क्यांनी घसरून २,४४७.५० कोटी रुपयांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा महसूल ३०३३.३० कोटी रुपये होता. 

कंपनीचे ऑर्डर बुक मजबूत स्थितीत आहे. त्याचं मूल्य एकूण २४२५३ कोटी रुपये आहे. त्यात रेल्वेच्या १८,९५९ कोटी, महामार्ग ५२१० कोटी तर इतर ८४ कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा समावेश आहे. 

सप्टेंबर तिमाहीत इरकॉन इंटरनॅशनलचा एबिटडा २०१ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा एबिटडा २६३ कोटी रुपये होता. कंपनीच्या मार्जिनमध्ये वाढ झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत मार्जिन ८.६ टक्के होते. गेल्या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत तो ८.२ टक्के होता.

शेअर बाजारात कंपनीची स्थिती कशी?

कंपनीचा शेअर गुरुवारी १.७४ टक्क्यांनी घसरून २१५.१० रुपयांवर बंद झाला. गेल्या ३ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत २१.६१ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षभरात हा शेअर ४१.०५ टक्के परतावा देण्यात यशस्वी ठरला आहे. तर, २ वर्षांपासून स्थिर असलेल्या शेअरच्या किंमतीत ३३१ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

इरकॉन इंटरनॅशनलचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३५१.६५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १५०.५० रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप २०,२३०.४९ कोटी रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner