प्रसिद्ध रेल्वे कंपनीला मिळालं ८९ कोटींचं कंत्राट, शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  प्रसिद्ध रेल्वे कंपनीला मिळालं ८९ कोटींचं कंत्राट, शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या

प्रसिद्ध रेल्वे कंपनीला मिळालं ८९ कोटींचं कंत्राट, शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या

Dec 27, 2024 05:38 PM IST

Ircon International Share Price : इरकॉन इंटरनॅशनल रेल्वेकडून तब्बल ८९ कोटींचं कंत्राट मिळालं असून त्यामुळं शेअर उसळला आहे.

प्रसिद्ध रेल्वे कंपनीला मिळालं ८९ कोटींचं कंत्राट, शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
प्रसिद्ध रेल्वे कंपनीला मिळालं ८९ कोटींचं कंत्राट, शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या

Railway Stock News Today : रेल्वे क्षेत्रातील एक आघाडीची कंपनी इरकॉन इंटरनॅशनलला ईशान्य रेल्वेकडून २ मोठ्या वर्कऑर्डर मिळाल्या आहेत. या कामाची एकूण किंमत ८९ कोटी रुपये आहे. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार हे काम 24 महिन्यांत पूर्ण करायचं असून ही बातमी समजताच गुंतवणूकदारांनी कंपनीचा शेअर खरेदी करण्याचा सपाटा लावला. त्यामुळं शेअरचा भाव वधारला.

शेअर बाजारातील बातमीनंतर कंपनीच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांची वाढ झाली. कालच्या तुलनेत आज कंपनीचा शेअर २१३.८० रुपयांच्या पातळीवर उघडला. कंपनीच्या शेअर्समध्ये आज ३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. बीएसईवर कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ३५१.६५ रुपये आणि ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १६७.७५ रुपये आहे.

मागील सहा महिने घसरणीचे, पण…

गेल्या आठवडाभरात इरकॉन इंटरनॅशनलच्या शेअरमध्ये सुमारे ४ टक्क्यांची घसरण झाली आहे. तर हा शेअर ६ महिन्यांत २२ टक्क्यांनी घसरला आहे. गेल्या ६ महिन्यांत हा शेअर घसरला असला तरी वर्षभर कंपनीचे शेअर्स होल्ड केलेल्या गुंतवणूकदारांना आतापर्यंत २४ टक्के परतावा मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांत इरकॉन इंटरनॅशनलच्या शेअरमध्ये २८४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर ज्या गुंतवणूकदारांनी ५ वर्षे शेअर्स ठेवले आहेत, त्यांना ४०० टक्क्यांहून अधिक नफा झाला आहे.

कंपनीनं दिलेत बोनस शेअर्स

इरकॉन इंटरनॅशनलनं २०२१ मध्ये गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स दिले होते. त्यावेळी कंपनीनं एका शेअरसाठी बोनस म्हणून एक शेअर दिला. तर २०२४ मध्ये या कंपनीनं गुंतवणूकदारांना २ वेळा लाभांश दिला. कंपनीनं प्रति शेअर अनुक्रमे १.८० रुपये एकरकमी लाभांश आणि १.३० रुपये प्रति शेअर एकरकमी लाभांश दिला. ट्रेंडलिनच्या आकडेवारीनुसार, या कंपनीत सरकारचा एकूण हिस्सा ६५ टक्क्यांहून अधिक आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner