Railtel Share : नवोदय विद्यालय समितीकडून १७ कोटींचं कंत्राट मिळताच रेल्वे कंपनीचा शेअर सुस्साट
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Railtel Share : नवोदय विद्यालय समितीकडून १७ कोटींचं कंत्राट मिळताच रेल्वे कंपनीचा शेअर सुस्साट

Railtel Share : नवोदय विद्यालय समितीकडून १७ कोटींचं कंत्राट मिळताच रेल्वे कंपनीचा शेअर सुस्साट

Jan 29, 2025 04:45 PM IST

Railtel Share Price : नवोदय विद्यालय समितीकडून रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला १७ कोटींची ऑर्डर मिळाली असून त्याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या शेअरवर झाला आहे.

Railtel Share : नवोदय विद्यालय समितीकडून १७ कोटींचं कंत्राट मिळताच रेल्वे कंपनीचा शेअर सुस्साट
Railtel Share : नवोदय विद्यालय समितीकडून १७ कोटींचं कंत्राट मिळताच रेल्वे कंपनीचा शेअर सुस्साट

Railtel Share Price : आयटी इन्फ्रा प्रकल्पाची खरेदी आणि देखभालीसाठी मेसर्स नवोदय विद्यालय समितीकडून रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी कंपनीला मोठी ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरनंतर रेलटेलच्या शेअरवर गुंतवणूकदार अक्षरश: तुटून पडले असून आज कंपनीचा शेअर ७ टक्क्यांहून अधिक वाढून ३७६.९० रुपयांवर पोहोचला.

रेलटेलचा शेअर जुलै २०२४ मध्ये ६१८ रुपयांवर होता. हा शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक आहे. मार्च २०२४ मध्ये शेअरची किंमत ३०१.३५ रुपये होती. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर होता. शेअरच्या किंमतीचा हा प्रवास बघता हा शेअर सध्या रिकव्हरी मोडमध्ये दिसत आहे.

नवोदय विद्यालय समितीकडून रेलटेलला मिळालेल्या ऑर्डरची किंमत करासह १७ कोटींहून अधिक आहे. हे काम पूर्ण करण्याची अंतिम मुदत २७ जुलै २०२५ आहे. यापूर्वी रेलटेलला दोन मोठ्या ऑर्डर मिळाल्या होत्या. एकाची किंमत ७८.४३ कोटी रुपये आहे. ही ऑर्डर भारत कोकिंग कोलची आहे. तर, अजमेर विभागाच्या बांधकामासाठी वायव्य रेल्वेनं ४६.७९ कोटी रुपये खर्च केले आहेत.

रेलटेलचे तिमाही निकाल

डिसेंबर २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत रेलटेलचx एबिटडा मार्जिन गेल्या वर्षीच्या याच तिमाहीतील १९.४ टक्क्यांवरून १५.८ टक्क्यांवर आलं आहे. मात्र, कंपनीच्या नफ्यात पाच टक्क्यांनी वाढ झाली असून, गेल्या वर्षीच्या ६२.१ कोटी रुपयांवरून तो ६५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या तिमाहीत कंपनीचा महसूल ७६७.६ कोटी रुपये राहिला. आर्थिक वर्ष २०१४ च्या तिसऱ्या तिमाहीतील ६६८.४ कोटी रुपयांच्या तुलनेत यात १४.८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

काय आहे कंपनीचा व्यवसाय?

रेलटेल कॉर्पोरेशन ही ब्रॉडबँड आणि व्हीपीएन सेवांमध्ये तज्ञ असलेली नवरत्न (PSU) आहे. सप्टेंबर २००० मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीचं उद्दिष्ट भारतीय रेल्वेसाठी रेल्वे नियंत्रण परिचालन आणि सुरक्षा प्रणाली वाढवताना ब्रॉडबँड, दूरसंचार आणि मल्टिमीडिया नेटवर्क विकसित करणं हे आहे. रेलटेलचं विस्तृत जाळं भारतातील सुमारे ५,००० रेल्वे स्थानकांवर पसरलं आहे. या माध्यमातून देशभरातील प्रमुख व्यावसायिक केंद्र जोडण्यात आली आहेत.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner