रेल्वे कंपनीच्या शेअरनं मिळवून दिला ४ वर्षात २४०० टक्के नफा, नव्या कंत्राटामुळं आणखी तेजीची शक्यता
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  रेल्वे कंपनीच्या शेअरनं मिळवून दिला ४ वर्षात २४०० टक्के नफा, नव्या कंत्राटामुळं आणखी तेजीची शक्यता

रेल्वे कंपनीच्या शेअरनं मिळवून दिला ४ वर्षात २४०० टक्के नफा, नव्या कंत्राटामुळं आणखी तेजीची शक्यता

HT Marathi Desk HT Marathi
Nov 05, 2024 04:55 PM IST

RVNL Share Price : मागील चार वर्षांत गुंतवणूकदारांना तब्बल २४०० टक्के परतावा देणाऱ्या आरव्हीएनलला आता नवं कंत्राट मिळालं आहे. त्यामुळं कंपनीचा शेअर पुन्हा चर्चेत आला आहे.

रेल विकास निगम लिमिटेडचा शेअर ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ६४७ रुपये आहे.
रेल विकास निगम लिमिटेडचा शेअर ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ६४७ रुपये आहे.

RVNL Share Price : नवरत्न कंपनी रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या काही वर्षांत प्रचंड वाढ झाली आहे. वाढीचं हे सत्र आजही सुरूच राहिलं आणि हा शेअर ४५६.९० रुपयांवर पोहोचला. कंपनीला मिळालेलं नवं कंत्राट यासाठी कारण ठरलं आहे. आरव्हीएनएलच्या एससीपीएलसोबतच्या संयुक्त उपक्रमाला पूर्व रेल्वेच्या प्रकल्पासाठी ८३७.६७ कोटी रुपयांचं कंत्राट मिळालं आहे.

रेल्वे विकास निगम लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार, या कंत्राटात काली डोंगरी ते प्रधानखंडा दरम्यान कटिंग आणि फिलिंग, लहान-मोठे पूल बांधणे, संरक्षक भिंत, लेव्हल क्रॉसिंग, साइड ड्रेन, कॅच वॉटर ड्रेनचे काम यांचा समावेश आहे. हा करार ३६ महिन्यांत पूर्ण करायचा आहे. या संयुक्त उपक्रमात रेल विकास निगम लिमिटेडचा ७४ टक्के वाटा आहे. तर एससीपीएलचा संयुक्त उपक्रमात २६ टक्के वाटा आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या इंजिनीअरिंग, प्रोक्योरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (ईपीसी) कंत्राटासाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली आहे. हे कंत्राट ६२५.०८ कोटी रुपयांचे आहे.

कशी आहे शेअरची वाटचाल?

गेल्या ४ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये २४०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ६ नोव्हेंबर २०२० रोजी रेल्वे कंपनीचा शेअर १८.४५ रुपयांवर होता. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर ४५६.९० रुपयांवर पोहोचला आहे. तर गेल्या ३ वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये ११५० टक्के वाढ झाली आहे. दोन वर्षांत रेल्वे कंपनीच्या शेअरमध्ये ९०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या वर्षभरात रेल विकास निगम लिमिटेडचे (आरव्हीएनएल) समभाग १९३ टक्क्यांनी वधारले आहेत. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर ६४७ रुपये आहे. तर कंपनीच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १५४.१० रुपये आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner