मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Rahul Gandhi Portfolio : राहुल गांधी यांची एकूण संपत्ती किती? शेअर मार्केट व म्युच्युअल फंडात किती आहे गुंतवणूक? वाचा!

Rahul Gandhi Portfolio : राहुल गांधी यांची एकूण संपत्ती किती? शेअर मार्केट व म्युच्युअल फंडात किती आहे गुंतवणूक? वाचा!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Apr 04, 2024 12:04 PM IST

Rahul Gandhi Investment : काँग्रेस नेते राहुल गांधी हे गुंतवणुकीच्या बाबतीत जागरूक असून त्यांनी शेअर बाजार व म्युच्युअल फंडामध्ये पुरेशी गुंतवणूक केली आहे.

 'या' १० शेअरमध्ये आहे राहुल गांधी यांची गुंतवणूक, म्युच्युअल फंडातही टाकलेत पैसे
'या' १० शेअरमध्ये आहे राहुल गांधी यांची गुंतवणूक, म्युच्युअल फंडातही टाकलेत पैसे (AFP)

Rahul Gandhi Portfolio : केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. अर्ज दाखल करताना निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती समोर आली आहे. तसंच, शेअर बाजार व म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीची माहितीही समोर आली आहे. त्यानुसार शेअरमध्ये त्यांची ४.३ कोटी रुपयांची गुंतवणूक असून म्युच्युअल फंडांत ३.८१ कोटी रुपयांच्या ठेवी आहेत.

राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये वायनाड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्यांचा चार लाखांहून अधिक मताधिक्यानं विजय झाला होता. यावेळी पुन्हा ते वायनाडमधून नशीब आजमावत आहेत. त्यासाठी त्यांनी काल अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्जासोबत दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्ती, मालमत्ता आणि उमेदवारावरील प्रलंबित खटल्यांची वैयक्तिक माहिती आहे.

राहुल गांधी यांची एकूण संपत्ती २०.४ कोटी आहे. त्यात ९.२४ कोटी रुपयांची जंगम आणि ११.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांनी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड व सुवर्ण रोख्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.

राहुल गांधींच्या गुंतवणुकीचा तपशील

सॉव्हरिन गोल्ड बाँडमध्ये राहुल गांधी यांची काही प्रमाणात गुंतवणूक आहेत. १५ मार्च २०२४ पर्यंतच्या बाजारमूल्यानुसार त्यांच्याकडं १५.२१ लाख रुपयांचे सॉव्हरिन गोल्ड बाँड आहेत.

शेअरमधील गुंतवणूक

पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड - ४२.२७ लाख रुपयांचे १४७४ शेअर्स

बजाज फायनान्स लिमिटेड - ३५.८९ लाख किंमतीचे ५५१ शेअर्स

नेस्ले इंडिया लिमिटेड - ३५.६७ लाख किंमतीचे १३७० शेअर्स

एशियन पेंट्स लिमिटेड - ३५.२९ लाख किंमतीचे १२३१ शेअर्स

टायटन कंपनी लिमिटेड - ३२.५९ लाखांचे ८९७ शेअर्स

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड - २७.०२ लाख किमतीचे ११६१ शेअर्स

आयसीआयसीआय बँक - २४.८३ लाख किमतीचे २२९९ शेअर्स

डिव्हिस लॅबोरेटरीज लिमिटेड - १९.७ लाख रुपये किमतीचे ५६७ शेअर्स

सुप्रजित इंजिनिअरिंग लिमिटेड - १६.६५ लाख किमतीचे ४०६८ शेअर्स

गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड - १६.४३ लाख किमतीचे ५०८ शेअर्स

म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक

एचडीएफसी स्मॉल कॅप रेग-जी - १.२३ कोटी

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल रेग सेव्हिंग्ज-जी - १.०२ कोटी

पीपीएफएएस एफसीएफ डी ग्रोथ - १९.७६ लाख

एचडीएफसी एमसीओपी डीपी जीआर - १९.५८ लाख

आयसीआयसीआय ईक्यू अँड डीएफएफ - १९.०३ लाख

वायनाडचे मतदान कधी?

केरळमधील लोकसभेच्या २० जागांसाठी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यात वायनाड लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.

WhatsApp channel