मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Raghuram Rajan : भारतीय अर्थव्यवस्थेबाबत रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “निवडणुकीत मोदी यांचा पराभव झाल्यास..”

Raghuram Rajan : भारतीय अर्थव्यवस्थेबाबत रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, “निवडणुकीत मोदी यांचा पराभव झाल्यास..”

May 29, 2024 06:15 PM IST

Raghuram Rajan : भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनो अथवा न बनो,भारत आपल्या आर्थिक धोरणांनुसार पुढे चालत राहील.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन
भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन

Raghuram rajan On indian economy : रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी देशातील आगामी सरकारबाबत महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. रघुराम राजन यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सत्तेत येऊ देत किंवा नसो, भारत आपले आर्थिक धोरण कायम ठेऊ शकतो. राजन यांनी ब्लूमबर्ग टीव्हीचे डेविड इंगल्स सोबत मंगळवारी एका मुलाखतीत म्हटले की, भारतीय धोरणामध्ये एक सातत्य असते. कोणतेही सरकार आले तर मागील सरकारच्या चांगल्या गोष्टी पुढेही सुरू ठेवल्या जातील.

ट्रेंडिंग न्यूज

लोकसभा निवडणुकीतील अंतिम टप्प्यातील मतदान बाकी आहे. त्यानंतर ४ जून रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीबाबत सत्ताधारी व विरोधी आघाडीकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. भाजपाप्रणित एनडीएने दावा केला आहे की, त्यांना या निवडणुकीत ४०० हून अधिक जागा मिळतील. तर विरोधी पक्ष दावा करत आहेत की, भाजपा केवळ २०० ते २५० जागाच जिंकेल. दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनो अथवा न बनो, भारत आपल्या आर्थिक धोरणांनुसार पुढे चालत राहील. या निवडणुकीच्या निकालाचा देशाच्या आर्थिक धोरणांवर काहीच परिणाम होणार नाही.

रघुराम राजन मोदी सरकारच्या धोरणांविरोधात सातत्याने आवाज उठवत असतात. अर्थतज्ज्ञ रघुराम राजन सध्या अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेसमध्ये अद्यापनाचं काम करत आहेत. राजन यांनी नुकतीच ब्लूमबर्ग टीव्हीला एक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भारताची आर्थिक धोरणं, निवडणुकीचे त्यावरील परिणाम आणि आगामी वाटचालीवर भाष्य केलं.

राजन यांनी म्हटले की, मोदी सरकारच्या काळात पायाभूत सुविधांवर होणार खर्च देशाची गरज म्हणून आवश्यक होता. दरम्यान आता यापूढे जाऊन भारताला आपल्या पायाभूत सुविधा (कॅपेक्स) ची गुणवत्तेवर लक्ष देण्याची गरज आहे. त्याचबरोबर याचीही खबरदारी घ्यावी लागणार आहे की, गुंतवणुकीचा लाभ केवळ प्रमुख औद्योगिक कंपन्यांनाच मिळू नये. ब्लूमबर्ग इकोनॉमिक्सचा अंदाज आहे की, भारत २०२४ आणि २०२६ दरम्यान नव्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर ४४.४ लाख कोटी रुपये ($५३४ बिलियन) खर्च करेल. जो २०२३० पर्यंत आर्थिक विकास दर ९ टक्क्यांवर नेण्यास सहाय्य  करेल.

WhatsApp channel