रॉयल एनफिल्ड कंपनीने नुकतीच बहुप्रतीक्षित रोडस्टर, गुरिल्ला ४५० ही दणकेबाज बाइक लाँच केली आहे. बाइक मार्केटमध्ये ४००-५०० सीसी सेगमेंट हा अत्यंत स्पर्धात्मक मानला जातो. नवीन रॉयल एनफिल्ड गुरिल्ला ४५० (Royal Enfield Guerrilla 450) ही हिमालय प्लॅटफॉर्मवर आधारित एनफिल्ड ब्रँडची दुसरी ऑफर आहे. ४५० सीसी श्रेणीतील या मोटारसायकलची किंमत २.३९ लाख रुपये ते २.५४ लाख रुपयांदरम्यान (एक्स शो रुम) ठेवण्यात आली आहे. परंतु त्याच किमतीच्या श्रेणीतील इतर मोटारसायकलींच्या तुलनेत ही किंमत परवडण्यायोग्य आहे का? रॉयल एनफिल्ड गुरिल्ला ४५० ची बाजारपेठेत कुणासोबत स्पर्धा आहे? चला तर जाणून घेऊ या…
किंमत आणि दणकट बाह्यरचने बाबत हार्ले-डेव्हिडसन एक्स ४४० ही बाइक गुरिल्ला ४५० ची सर्वात जवळची प्रतिस्पर्धी मानली जाते. हिरो-ब्रीड हार्ले एक्स ४४० भारतात तयार करण्यात आलेली बाइक असून त्याची किंमत २.४० लाख ते २.८० लाख रुपये (एक्स शोरूम) आहे. ४४० सीसी सिंगल सिलिंडर, २७ बीएचपी पॉवर आणि ३८ एनएम पीक टॉर्क सह ४४० सीसी सिंगल सिलिंडर, ऑइल कूल्ड इंजिन आणि ६-स्पीड गिअरबॉक्स या बाइकमध्ये आहे. हार्लेमध्ये ४३ एमएम यूएसडी फ्रंट फोर्क आणि मागील बाजूस ७-स्टेप प्रीलोड-अॅडजस्टेबल ट्विन शॉक देण्यात आले आहेत. ब्रेकिंग परफॉर्मन्स डिस्क ब्रेकमधून येतो. एक्स ४४० रोडस्टरमध्ये सिग्नेचर एलईडी हेडलॅम्प आणि ३.५ इंच आकाराचा टीआरएफ डिस्प्ले देण्यात आला आहे.
मूळचा ब्रिटनचा ब्रॅंड असलेला आणि भारतात बजाज कंपनीतर्फे उत्पादन करण्यात येत असलेली ट्रायम्फ स्पीड ४०० ही क्लासिक रोडस्टर बाइक मानली जाते. या बाइकची किंमत २.२४ लाख रुपये असून गेल्या वर्षभरात भारतीय बाजारपेठेत तरुणांकडून या बाइकला चांगली मागणी आहे. या बाइकमध्ये ३९८ सीसी सिंगल सिलिंडर, लिक्विड कूल्ड मोटर ४० बीएचपी आणि ३७.५ एनएम टॉर्क आणि ६-स्पीड गिअरबॉक्स देण्यात आले आहे. सस्पेंशन ड्युटी ४३ मिमी यूएसडी फ्रंट फोर्क आणि मागील बाजूस मोनोशॉकसह डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनेल एबीएस आहे. गुरिल्ला ४५० प्रमाणे स्पीड ४००मध्ये कनेक्टिव्हिटी फीचर देण्यात आलेले नाही. रॉयल एनफिल्ड गुरिल्ला ४५० च्या तुलनेत ट्रायम्फ स्पीड ४०० ही बाइक वजनाने ९ किलो हलकी आहे.
द हस्कवर्ना स्वार्टपिलेन ही बाइक केटीएम ३९० ड्यूकच्या तंत्रज्ञानावर आधारलेली आहे. याची किंमत २.९२ लाख रुपये (एक्स-शोरूम) असून गुरिल्लापेक्षा स्वार्टपिलेन ४०१ ही बाइक महाग आहे. या बाइकमध्ये ३९९ सीसी सिंगल सिलिंडर, ४५ बीएचपी पॉवर आणि ३९ एनएम टॉर्क जनरेट करणारी लिक्विड कूल्ड मोटर देण्यात आली आहे. बाइकमध्ये डिस्क ब्रेक आणि ड्युअल चॅनेल एबीएससह डब्ल्यूपीकडून अधिक अत्याधुनिक सस्पेंशन सेटअप देखील देण्यात आला आहे.
होंडा सीबी ३०० आर (Honda CB300R) ला स्ट्रीटफायटर बाइक म्हटलं जातं. सीबी ३०० आरची एक्स-शोरूम किंमत २.४० लाख रुपये असून ती गुरिल्ला ४५० च्या तुलनेत कमी पॉवर देते. परंतु ३०० सीसीलिक्विड-कूल्ड, सिंगल सिलिंडर इंजिनपेक्षा ३० बीएचपी आणि २७.५ एनएम वर कमी पॉवर देते. रॉयल एनफिल्ड गुरिल्लाचे वजन १८५ किलो असून त्या तुलनेत होंडा सीबीचे वजन १४६ किलो आहे. या दोन्ही बाइक्समध्ये असिस्ट आणि स्लीपर क्लच, राइड बाय वायर, ट्यूबलेस टायर इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश आहे. होंडामध्ये कनेक्टिव्हिटी फीचर्स कमतरता आहे. रॉयल एनफिल्ड गुरिल्लामध्ये ४३ मिमीचे टेलिस्कोपिक फोर्क असून सीबी ३०० आरमध्ये ४१ मिमी यूएसडी फोर्क आहेत.
हीरो मोटोकॉर्पची फ्लॅगशिप मोटारसायकल असलेली हिरो मावरिक ४४० ही बाइक रॉयल एनफ्लिड गुरिल्लाला टक्कर देणारी बाइक आहे. हिरो मावरिक ४४० ची एक्स-शोरुम किंमत १.९९ लाख ते २.२४ लाखाच्या घरात आहे.
संबंधित बातम्या